सेंट डेनिस - फ्रान्स, इटली आणि क्रोएशियाने नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात धडाकेबाज विजयाची नोंद केली. दुसरीकडे याच मैत्रीपूर्ण सामन्यात हॉलंड संघाला मात्र पराभवाची धूळ चाखावी लागली.
रॅमीने केलेल्या (७३ मि.) गोलच्या बळावर फ्रान्स संघाने रंगतदार लढतीत स्पेनचा पराभव केला. या संघाने १-० अशा फरकाने सामना
आपल्या नावे केला. मध्यंतरापर्यंत ही लढत शून्य गोलने बराेबरीत रंगली हाेती. दुसऱ्या हाफमध्येही दोन्ही संघांच्या खेळाडूंना समाधानकारक खेळी करता आली नाही. अखेर ७३ व्या मिनिटाला फ्रान्सकडून रॅमीने गोलचे खाते उघडले.
इटलीची हॉलंडवर मात
इटलीसंघाने सामन्यात हॉलंडचा २-० अशा फरकाने पराभव केला. इम्माबिले (३ मि.) आणि डे राेस्सी (१० मि.) यांनी गोलच्या बळावर इटली संघाने सामना जिंकला. इम्माबिलेने इटलीला दमदार सुरुवात करून दिली. त्यामुळेच इटलीला तिसऱ्याच मिनिटाला १-० ने आघाडी घेता आली. त्यानंतर डे राेस्सीने पेनल्टी काॅर्नरवर इटली संघाकडून दुसरा गोल केला. त्यामुळे इटलीला एकतर्फी विजय संपादन करता अाला. क्रोएशियाने हॉलंडविरुद्ध शानदार विजय मिळवला. मडुंझुकीचने केलेल्या दाेन गोलच्या बळावर क्राेएिशयाने २-० अशा फरकाने सामना जिंकला. या वेळी सायप्रसने केलेले सर्व प्रयत्न सामन्यात अपयशी ठरले.
स्पेनचा डेव्हिड सिल्वा आणि फ्रान्सचा पॅट्रिक यांच्यात रंगलेली चुरस.