आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Frankline Become First Lady To Won Largest Gold Medal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्वाधिक सुवर्णपदके जिंकणारी फ्रँकलिन ठरली पहिली महिला जलतरणपटू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्सलोना - ‘मिसी मोटर्स’ नावाने प्रसिद्ध असलेल्या मिसी फ्रँकलिनने जागतिक जलतरण स्पर्धेत सहावे सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास रचला. एकाच स्पर्धेत सर्वाधिक सुवर्णपदके जिंकणारी फ्रँकलिन पहिली महिला जलतरणपटू ठरली.

अमेरिकेच्या 18 वर्षीय फ्रँकलिनने मेडले रिलेमध्ये सहावे सुवर्णपदक जिंकले. तिने 100 मीटर बॅकस्ट्रोक, 200 मीटर बॅकस्ट्रोक, 200 मीटर फ्री स्टाइलमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. चार गुणे 100 मीटर आणि चार गुणे 200 मीटर फ्रीस्टाइलमध्येही तिने सुवर्ण पटकावले. यासह फ्रँकलिनने आपल्या देशातील ट्रेसी कालकिंस व ऑस्ट्रेलियाच्या लिब्बी ट्रिकेटचा विक्रम मोडला.

2011 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तीन किताब जिंकणार्‍या फ्रँकलिनने ट्रिकेटच्या सर्व प्रकारातील नऊ सुवर्ण जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली.


फँकलिनची सोनेरी लयलूट
100 मीटर बॅकस्ट्रोक 58.42 सेकंद
200 मी. बॅकस्ट्रोक 2 मि.04.76 सेकंद
200 मी. फ्रीस्टाइल 1 मि.54.81 सेकंद
4 गुणे 100 मी. फ्रीस्टाइल 3 मि.32.31 सेकंद
4 गुणे 200 मी. फ्रीस्टाइल 3 मि.53.23 सेकंद
4 गुणे 100 मी. मेडले 3 मि.53.23 सेकंद

सून यांगला तीन सुवर्णपदके
चीनच्या सून यांगने 1500 मीटरमध्ये सुवर्णपदक पटकावले.तिने एकाच स्पर्धेत 400, 800 व 1500 मीटर स्पर्धा जिंकण्याची अपूर्व कामगिरी केली आहे. ही उल्लेखनीय कामगिरी करणारी ती जगातील दुसरी खेळाडू ठरली. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या ग्रॉँट हॅकेटने 2005 मध्ये मॉट्रियलमध्ये ही कामगिरी केली होती.

फेल्प्सचा विक्रम कायम
मिसीने सहा सुवर्णपदक जिंकून सर्व प्रकारातील कामगिरीत इयान थोर्पची बरोबरी साधली. ऑस्ट्रेलियाच्या थोर्पने 2001 मध्ये जागतिक जलतरण स्पर्धेत सहा सुवर्णपदक जिंकले होते. मात्र, मायकेल फेल्प्सचा सात सुवर्णपदकाचा विक्रम अद्यापही कायम आहे. अमेरिकेच्या या खेळाडूने 2007मध्ये मेलबर्न येथील स्पर्धेत हा विक्रम केला होता.

महिलांच्या 4 गुणे 100 मीटर रिलेचे सुवर्णपदक पटकावणारा अमेरिकेचा संघ. डावीकडून अनुक्रमे विजेत्या खेळाडू मिसी फ्रँकलिन, जेसिका हार्डी, डॅना वोल्मर, मेगन रोमानो.

34 पदकांसह अमेरिका चॅम्पियन
अमेरिकेने सर्वाधिक 15 सुवर्णसह 34 पदकांची कमाई करताना चॅम्पियनशिप आपल्या नावे केली.या संघाने 10 रौप्य आणि नऊ कांस्यपदकेही आपल्या नावे केली आहेत. चीन संघाने 14 सुवर्ण, आठ रौप्य आणि चार कांस्यसह एकूण 26 पदकांची कमाई केली. याच्या बळावर चीनने दुसरे स्थान पटकावले. रशियाने नऊ सुवर्ण, सहा रौप्य आणि चार कांस्यसह एकूण 19 पदके जिंकून तिसर्‍या स्थानावर धडक मारली. अमेरिकेने जलतरण स्पर्धेत 13 सुवर्ण जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले.

जागतिक जलतरण स्पर्धा; फ्रँकलिन सहा सुवर्णपदके जिंकणारी पहिली महिला जलतरणपटू