आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रेंच ओपन: ब्रायन बंधूंना पुरुष दुहेरीचे विजेतेपद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - जबरदस्त फॉर्मात असलेल्या बॉब आणि माइक ब्रायन बंधूंनी रविवारी फ्रेंच ओपनच्या पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकले. गतविजेत्या जोडीने फायनलमध्ये मायकल लोड्रा व निकोलस माहूतचा पराभव केला. अमेरिकेच्या या जोडीने 6-5, 4-6, 7-6 अशा फरकाने दुहेरीचा सामना जिंकला. या विजयासह ब्रायन बंधूंनी 14 वा पुरुष दुहेरीचा किताब आपल्या नावे केला. तसेच बॉब आणि माइकने ऑस्ट्रेलियाचे प्रसिद्ध टेनिसपटू जॉन न्यूकोबे व टोनी रोचे यांच्या विक्रमाची बरोबरी केली.


दहा वर्षांनंतर किताब जिंकला
दहा वर्षांनंतर बॉब-माइक ब्रायनने फ्रेंच ओपन दुहेरीचा किताब जिंकला. यापूर्वी 2003 मध्ये ही जोडी विजेती ठरली होती. त्यांनी 2005, 2006, 2012 मध्ये उपविजेतेपद मिळवले.