आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • French Open: Maria Sharapova, Novak Djokovic Win

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा: मारिया शारापोवाची विजयी सलामी, 61 मिनिटांत पेर्वाकचा पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - रशियाची स्टार महिला खेळाडू मारिया शारापोवाने सोमवारी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. सातव्या मानांकित शारापोवाने रशियाची युवा खेळाडू के. पेर्वाकचा पराभव केला. तिने पहिल्या फेरीत 6-1, 6-2 अशा फरकाने सामना जिंकला. यासह शारापोवाने अवघ्या 61 मिनिटांमध्ये महिला एकेरीच्या दुसर्‍या फेरीत धडक मारली.
सिबुलकोवाची रझानोवर मात : नवव्या मानांकित डोमिनिका सिबुलकोवाने दुसर्‍या फेरीत धडक मारली. तिने महिला एकेरीच्या सलामी सामन्यात फ्रान्सच्या व्ही. रझानोचा 7-5, 6-0 ने पराभव केला.
सबिना लिसिकी विजयी : जर्मनीच्या सबिना लिसिकीने पहिल्या फेरीत फ्रान्सच्या ए्यफ.फेरोचा पराभव केला. 16 व्या मानांकित लिसिकीने 6-1, 7-5 ने सामना जिंकला.
सानियाची वाट खडतर : भारताची महिला टेनिसस्टार सानिया मिर्झा व कारा ब्लॅक दुहेरीत पाचवे मानांकन देण्यात आले. सानिया-कारा या पाचव्या मानांकित जोडीचा उपांत्यपूर्व सामना तैपईच्या सु वेई सीह आणि चीनची शुहाई पिंग या अव्वल मानांकित जोडीशी होणार आहे. तत्पूर्वी, सानिया-काराचा सलामी सामना स्लोव्हाकियाची डॅनियला हंतुचोवा आणि सहर पीर यांच्याशी होईल.