आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रेंच ओपन : सेरेनाची विजयी सलामी; रंदावास्का, व्हीनस विजयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - जगातील नंबर वन सेरेना विल्यम्सने रविवारी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेला दमदार विजयाने सुरुवात केली. तिने सलामी सामन्यात फ्रान्सच्या लीमचा पराभव केला. अमेरिकेच्या खेळाडूने 6-2, 6-1 अशा फरकाने सामना जिंकून दुसरी फेरी गाठली.
तसेच तिसरी मानांकित अग्निजस्का रंदावास्कानेही विजयी सलामी दिली. तिने चीनच्या झांग शुईला पहिल्याच फेरीत पराभवाची धूळ चारली. जागतिक क्रमवारीत 34 व्या स्थानी असलेल्या रंदावास्काने 6-3, 6-0 अशा फरकाने सामना जिंकला.
व्हीनस दुसर्‍या फेरीत
जगातील माजी नंबर वन व्हीनस विल्यम्सनेही स्पर्धेत दमदार विजय मिळवला. तिने महिला एकेरीच्या लढतीत स्वीसच्या बी. बेनासिसचा पराभव केला. तिने 6-4, 6-1 अशा फरकाने सलामी सामना जिंकला.
सोमदेवची झुंज अपयशी
भारताचा एकेरीतील नंबर वन सोमदेव देववर्मनला पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्याच फेरीत त्याने दिलेली झुंज अपयशी ठरली. कझाकिस्तानच्या एडवर्ड नेदावेसोवने भारताच्या खेळाडूला पराभूत केले. त्याने 5-7, 6-3, 7-6, 6-3 अशा फरकाने सामना जिकंला. पराभवासह सोमदेवला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.