आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्रेंच ओपन: ली ना विजयी, जॉन इस्नरचा पराभव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - गतविजेती चीनची ली नाने शुक्रवारी सनसनाटी विजय मिळवून फ्रेंच ओपनच्या तिसर्‍या फेरीत धडक मारली. तिने महिला एकेरीच्या दुसर्‍या फेरीत फ्रान्सच्या स्टेफनी फोरेत्ज गेकोनला 6-0, 6-2 असा फरकाने धूळ चारली. दुसरीकडे अमेरिकन टेनिसपटू जॉन इस्नरला फ्रान्सच्या पॉल हेन्रीने 6-7, 6-4, 6-4, 3-6, 18-16 पराभूत केले.

महिलांच्या दुसर्‍या फेरीत ली नाच्या खडतर आव्हानाला सामोरे जाणार्‍या फ्रान्सच्या स्टेफनीचा फार काळ निभाव लागला नाही. सातव्या मानांकित ली नाने पहिल्या सेटमध्ये एकतर्फी खेळीचे प्रदर्शन केले. आक्रमक सर्व्हिस करत तिने पहिला सेट 6-0 ने आपल्या नावे केला. या सेटमध्ये स्टेफनीला प्रत्युत्तराची एकही संधी मिळाली नाही. दुसर्‍या सेटमध्ये तिने कमबॅक करत प्रत्युत्तराचा प्रयत्न केला.मात्र चीनच्या स्टार टेनिसपटूने हा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला. ली नाने हा सेट 6-2 ने जिंकून तिसर्‍या फेरीत प्रवेश केला.

शियावोनचा रोमहर्षक विजय

2010 ची फ्रेंच ओपन चॅम्पियन शियावोनने दुसर्‍या फेरीत रोमहर्षक विजयाची नोंद केली. बल्गेरियाच्या स्वेताना पिरोनकोवाने तिला चांगलेच झुंजवले. मात्र दमदार पुनरागमन करत शियावोनने 2-6, 6-3, 6-1 ने विजय मिळवला. पहिला सेट स्वेतानाने 6-2 ने जिंकून सहज आघाडी घेतली होती. मात्र तिला ती फार काळ टिकून ठेवता आली नाही. शियावोनने आक्रमक सर्व्हिस करत अनुक्रमे दुसरा व तिसरा सेट अनुक्रमे 6-3, 6-1 ने जिंकला.

एलेना यांकोविचचा पराभव

महिला एकेरीच्या दुसर्‍या फेरीत 19 वी मानांकित सर्बियन टेनिसपटू एलेना यांकोविचला पराभवाचा सामना करावा लागला. अमेरिकन टेनिसपटू वारवरा लेप्चेंकोने तिला 7-6, 4-6, 6-4 अशा फरकाने पराभूत केले. पहिला सेट ट्रायब्रेकरमध्ये खेळून वारवराने बाजी मारली.मात्र एलेनाने कमबॅक करत दुसरा सेट 6-4 ने बरोबरी साधली. त्यानंतर तिसर्‍या सेटमध्ये आव्हान राखून ठेवण्यासाठी तिने शर्थीची झुंज दिली.मात्र वारवराने सरस कामगिरी करत तिसरा निर्णायक सेट 6-4 ने जिंकून एलेनाला घरचा रस्ता दाखवला.

पेस-पेयाची विजयी सलामी

भारताचा स्टार टेनिसपटू लिएंडर पेसने शुक्रवारी आपला जोडीदार अलेक्झेंडरसोबत फ्रेंच ओपनमध्ये विजयी सलामी दिली.पेस-पेया या सातव्या मानांकित जोडीने पुरुष दुहेरीत इटलीच्या सिमोन बोलेली व फेबियो फोग्निनीवर 6-1, 7-6, 6-3 असा फरकाने मात केली. दोन तास रंगलेल्या या शर्थीच्या लढतीत पेस-पेयाने बाजी मारून दिमाखदारपणे दुसरी फेरी गाठली.

अँना इव्हानोविक बाहेर

सर्बियन टेनिसपटू अँना इव्हानोविकला दुसर्‍या फेरीत धूळ चाखावी लागली. इटलीची सारा इराणीने तिला 1-6, 7-5, 6-5 ने पराभूत केले. पहिल्या सेटमध्ये 6-1 ने बाजी मारणार्‍या अँनाने दुसर्‍या व तिसर्‍या सेटमध्ये गुडघे टेकले.

रझानोचे आव्हान संपुष्टात

अमेरिकन स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्सला घरचा रस्ता दाखवणार्‍या फ्रान्सच्या रझानोचे फ्रें च ओपन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. हॉलंडच्या अरास्ट्रा रुझने तिला 6-4, 6-3 अशा दोन सरळ सेटमध्ये पराभूत केले.


मारिया शारापोवा विजयी
महिला एकेरीच्या लढतीत रशियाच्या मारिया शारापोवाने जपानच्या आयुमी मारिटोचा सरळ दोन सेटमध्ये 6-1, 6-1 अशा फरकाने पराभव केला. तिने पहिल्या सेटमध्ये 6-1 ने बाजी मारून मारिटोवर सहज आघाडी घेतली होती.

मारिया किरिलेंको बाहेर

16 व्या मानांकित रशियाच्या मारिया किरिलेंकोचे शुक्रवारी फ्रेंच ओपनमधील आव्हान संपुष्टात आले. चेक गणराज्यच्या बिगर मानांकित क्लारा जाकोपालोवाने तिला 6-4, 3-6, 6-3 पराभवाचा अनपेक्षित धक्का दिला.
फ्रेंच ओपन टेनिस : व्हिनस बाहेर; नदाल विजयी
फ्रेंच ओपन: सेरेना विल्यम्सचा धक्कादायक पराभव, जोकोविच तिसर्‍या फेरीत
फ्रेंच ओपन: अँलेक्झांड्रा कॅड्रांटूचा पराभव; शारापोवा, क्वितोवा दुसर्‍या फेरीत
फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची सुरक्षा बहिरी ससाण्याच्या भरोश्यावर!