आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • French Open Tennis Championship Roger Federer In Last 16

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्रेंच ओपन । रॉजर फेडरर अंतिम 16 मध्ये; जोको‘विन’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - जागतिक क्रमवारीतील अग्रमानांकित सर्बियन टेनिसपटू नोवाक जोकोविचने शनिवारी रोमहर्षक विजय मिळवला. पुरुष एकेरीत फ्रान्सच्या निकोलस डेव्हिल्डरवर 6-1, 6-2, 6-2 अशा फरकाने मात करून त्याने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत अंतिम 16 मध्ये स्थान मिळवले. दुसरीकडे रॉजर फेडररने निकोलस माहूला 6-3, 4-6, 6-2, 7-5 ने धूळ चारत आपली विजयी मोहीम अबाधित ठेवली. महिला गटात गतविजेती चीनची ली ना हिने चौथी फेरी गाठली आहे. तिने तिस-या फेरीत अमेरिकेच्या ख्रिस्टोनावर मात केली. भारताच्या लिएंडर पेसला पुरुष दुहेरीच्या दुस-या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.
पुरुष एकेरीच्या पहिल्या लढतीत जोकोविचने आक्रमक खेळीचे प्रदर्शन करत उपस्थित चाहत्यांच्या डोळ्याचे पारणे फेडले. सलग चौथे ग्रण्डस्लॅम पटकावण्याच्या प्रयत्नात असलेल्या सर्बियाच्या टेनिसपटूला निकोलसविरुद्ध शर्थीची झुंज द्यावी लागली.नवोदित निकोलसने तब्बल 104 मिनिटे जोकोविचला विजयासाठी चांगलेच झुंजवले. अखेर अनुभवाच्या बळावर जोकोविचने वियश्री खेचून आणली. पहिल्या सेटमध्ये 30 मिनिटात 6-1 ने बाजी मारून आघाडी घेत जोकोविचने निकोलसला प्रत्युत्तराची एकही संधी मिळू दिली नाही.मात्र दमदार पुनरागमन करत निकोलसने पाच ऐस मारून जोकोविचवर प्रचंड दडपण निर्माण केले होते. या दडपणातुन त्याने आपली सहीसलामत सुटका करून घेतली.
अँडी मुरेची आघाडी
इंग्लंडच्या अँडी मुरेने पुरुष एकेरीत कोलंबियाच्या गिरल्डोला 6-3, 6-4, 6-4 अशा फरकाने पराभूत केले. दुस-या एका सामन्यात जांको टिप्सेविचने फ्रान्सच्या ज्युलियनवर 6-3, 7-5, 6-4
ने विजय मिळवला.
मारिया शारापोवाचा विजय
रशियन टेनिसपटू मारिया शारापोवाने तिस-या फेरीत चीनच्या पेंग शुईला सरळ दोन सेटमध्ये 6-2, 6-1 ने पराभुत केले. दुसरीकडे स्वीसच्या स्टानिस्लास वावरिंकाने चार तास 37 मिनिटाच्या मॅरेथॉन लढतीत फ्रान्सच्या जाइल्स सिमोनला धूळ चारली.
ली ना चौथ्या फेरीत
गतविजेत्या चीनच्या ली नाने अमेरिकेच्या ख्रिस्टिना मॅचहॅलेवर 3-6, 6-2, 6-1 ने मात केली. तिला विजयासाठी मोठी कसरत करावी लागली.

पेस-पेयाचे स्वप्न भंगले
लिएंडर पेस व अलेक्झांडर पेया या सातव्या मानांकित जोडीला रशियाचा मिखेल एलिग्ने व डेनिस इस्टोमिनेने 6-4, 6-1 ने पराभूत केले.
अडीच तासांत फेडरर विजयी
16 ग्रण्डस्लॅमचा किंग स्वीस टेनिसपटू रॉजर फेडररलाही विजयासाठी चांगलाच घाम गाळावा लागला. अडीच तासाच्या रंगलेल्या चित्तथरारक लढतीत त्याने निकोलस माहूचा 6-3, 4-6, 6-2, 7-5असा फरकाने पराभव केला.
नदाल चौथ्या फेरीत दाखल
स्पेनचा राफेल नदालने शनिवारी पूरूष एकेरीत बाजी मारून चौथी फेरी गाठली. त्याने अर्जेटिनाच्या स्वेवांनकला 6-1, 6-2 ने पराभूत केले.तसेच मोनाकोने रोमानिकवर 6-7, 6-3, 7-5 ने विजय मिळवला.
आजचे सामने
रॉजर फेडरर वि. डेव्हिड गाफिन,
नोवाक जोकोविच वि. आंद्रेस सिप्पी
जुआन मार्टिन वि. टॉमस बर्डिक
निकाल
नोवाक जोकोविच वि. वि. निकोलस
रॉजर फेडरर वि. वि. निकोलस माहू,
डेव्हिड फेरर वि. वि. मिखाइल युन्जी
निकोलस अगमाग्रो वि. वि. लियानार्दाे मेर,
मिखेल-इस्टोमिने वि. वि. पेस - पेया
महिला गट
पेत्रा क्वितोवा वि. वि. ब्रात्विकोवा
वारवरा लॅपचेंको वि. वि. शियावोन
ली ना वि. वि. मॅचहॅले