आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • French Open Tennis Competition Start Today, News In Marathi

राफेल नदालसमोर नववा किताब जिंकण्याचे आव्हान!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस- सत्रातील दुसर्‍या ग्रॅँडस्लॅम फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेला रविवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत जगातील नंबर वन राफेल नदालसमोर करिअरमध्ये फ्रेंच ओपनचा नववा किताब जिंकण्यासाठी खडतर आव्हान आहे. या स्पर्धेत नदालपाठोपाठ नोवाक योकोविक, ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन स्टॅनिलास, अँँडी मरे, रॉजर फेडररसारखे दिग्गज खेळाडू एकेरीचा किताब जिंकण्याच्या स्पर्धेत आहेत. पुरुष एकेरीत नदालचा सलामी सामना अमेरिकेच्या रॉबी गिनेप्रीशी होणार आहे. तसेच पाचव्या मानांकित डेव्हिड फेररची गाठ हॉलंडच्या इगोर सिसलिंगशी पडेल.

नदालला सलग पाचव्या किताबाची संधी
नदालला यंदा सलग पाचव्यांदा किताब जिंकण्याची संधी आहे. त्याने 2010 ते 2013 पर्यंत सलग चार वेळा विजेतेपद पटकावले. यंदाही वर्चस्व कायम ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असेल. त्याने 2005 मध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा जिंकली. त्यानंतर त्याने 2008 पर्यंत सलग अजिंक्यपद पटकावले. मात्र, 2009 मध्ये त्याची ही मालिका खंडित झाली होती.

सेरेना, नदालला अव्वल मानांकन
सत्रातील दुसर्‍या मोठय़ा स्पर्धेत अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि स्पेनचा राफेल नदालला क्रमश: महिला व पुरुष गटात अव्वल मानांकन देण्यात आले आहे. तसेच नोवाक योकोविकला दुसरे आणि ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन स्टॅनिलासला तिसरे मानांकन मिळाले आहे. लंडन ऑलिम्पिक चॅम्पियन अँँडी मरेला आठवे मानांकन देण्यात आले. तसेच महिला गटात ऑस्ट्रेलियन चॅम्पियन ली नाला दुसरे आणि रंदावास्काला तिसरे मानांकन मिळाले आहे.

सोमदेवसमोर नेदोवयेसोव
भारताचा एकेरीतील नंबर वन सोमदेवला फ्रेंच ओपनच्या पहिल्या फेरीत युक्रेनच्या एलेक्सांद्र नेदोवयेसोवच्या आव्हानाचा सामना करावा लागेल.