आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियन ओपन विजेती ली ना, वावरिंका बाहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन ली नाचे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील आव्हान अनपेक्षितपणे संपुष्टात आले. फ्रान्सच्या क्रस्टिना म्लाडेनोवाने माजी चॅम्पियन ली नावर सनासनाटी विजय मिळवला. तिने चीनच्या खेळाडूला दोन तास चार मिनिटांत बाहेर केले. फ्रान्सच्या क्रिस्टिनाने 7-5, 3-6, 6-1 ने सलामी सामना जिंकला. तसेच ऑस्ट्रेलियन ओपन विजेता स्टॅनिलास वांवरिकाला स्पेनच्या लोपेजने 6-4, 5-7, 6-2, 6-0 ने पराभूत केले.

जागतिक क्रमवारीत 102 व्या स्थानी असलेल्या क्रिस्टिनाने दमदार सुरुवात करताना 61 मिनिटे पहिला ट्रायब्रेकरपर्यंत रंगलेला सेट आपल्या नावे करून आघाडी घेतली. त्यानंतर दुसर्‍या सेटमध्ये ली नाने बाजी मारून लढतीत बरोबरी साधली. मात्र, तिला तिसर्‍या निर्णायक सेटमध्ये अपयशाला सामोरे जावे लागले. फ्रान्सच्या खेळाडूने 30 मिनिटांत ली नाला धूळ चारली.
पाचव्या मानांकित डेव्हिड फेररने पुरुष एकेरीच्या सलामी सामन्यात विजय मिळवला. त्याने हॉलंडच्या सिससिलंगचा 6-4, 6-3, 6-1 अशा फरकाने पराभव केला.
ग्रिगोर दिमित्रोव पराभूत
पुरुष एकेरीच्या पहिल्याच फेरीतील पराभवामुळे 11 व्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोवला बाहेर पडावे लागले. त्याला क्रोएशियाच्या आय. कालरेविकने पराभूत केले. क्रोएशियाच्या बिगरमानांकित खेळाडूने 6-4, 7-5, 7-6 ने सामना जिंकला.

लियोन हेविटचा पराभव
ऑस्ट्रेलियाच्या लियोन हेविटला पुरुष एकेरीच्या पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्याला सी. बेलोकने 3-6, 6-2, 6-1, 6-4 अशा फरकाने पराभूत केले. यासह बेलोकने दुसर्‍या फेरीत धडक मारली.

असा मिळवला विजय
7-5 पहिला सेट
61 मिनिटे
3-6 दुसरा सेट
33 मिनिटे
6-1 तिसरा सेट
30 मिनिटे

छायाचित्र : ली नाला हरवल्यानंतर अभिवादन करताना क्रिस्टिना.