आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापॅरिस- क्ले कोर्ट किंग राफेल नदाल आठव्यांदा फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचा किताब जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. स्पेनचे खेळाडू राफेल नदाल व डेव्हिड फेरर पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी समोरासमोर असतील. फेररने पहिल्यांदा फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. करिअरमध्ये 42 प्रयत्नांनंतर प्रथमच ग्रँडस्लॅमच्या फायनलमध्ये खेळणारा फेरर रोलँड गॅरोसमध्ये या वर्षी जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने स्पर्धेत आतापर्यंत एकही सेट गमावला नाही. मात्र, क्ले कोर्ट किंग नदालला पराभूत करणे, हे आव्हानात्मक असल्याचे फेरर मानतो. त्याने उपांत्य लढतीत ज्यो विल्फेंड त्सोंगाला नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला. तसेच योकोविकला बाहेरचा रस्ता दाखवून नदाल फायनलमध्ये पोहोचला.
नदालचा 19 वेळा फेररवर विजय
डेव्हिड फेररला टेनिस करिअरमध्ये जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या नदालकडून आतापर्यंत 19 वेळा पराभव पत्करावा लागला. केवळ चार सामन्यांत त्याने नदालला धूळ चारली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.