Home | Sports | Other Sports | french-open-tennis-maria-sharapova-in-semi-final

फ्रेंच ओपन । शारापोवा उपांत्य फेरीत

Agency | Update - Jun 02, 2011, 05:23 AM IST

पॅरिस & जागतिक क्रमवारीत सातवी मानांकित रशियन टेनिसपटू मारिया शारापोवा व चीनची 60 वी मानांकित टेनिसपटू ली ना यांनी फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत शानदार प्रवेश केला.

 • french-open-tennis-maria-sharapova-in-semi-final

  पॅरिस & जागतिक क्रमवारीत सातवी मानांकित रशियन टेनिसपटू मारिया शारापोवा व चीनची 60 वी मानांकित टेनिसपटू ली ना यांनी फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत शानदार प्रवेश केला. भारताच्या ‘इंडो-पाक’ रोहन बोपन्ना-कुरेशी या जोडीला दुहेरीत पराभवाचा धक्का बसला.
  शारापोवाची विजयी आघाडी
  महिला एकेरीत र्जमनीच्या अंद्रा पेकोविकविरुद्ध मारिया शारापोवा यांच्यात शर्थीची लढत झाली. विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानल्या जाणार्‍या मारियाने 2007 च्या कामगिरीला उजाळा दिला. पहिल्या सेटवर शारापोवाने आक्रमक खेळीचे शानदार प्रदर्शन करून 6-0 गुणांनी बाजी मारली. त्यानंतर दुसर्‍या सेटवर पेकोविकने आघाडीच्या आव्हानाला रोखण्याच्या प्रयत्न केला. मात्र, शारापोवा ने 6-3 गुणांच्या आघाडीने विजय संपादन करून उपांत्य फेरीत धडक मारली.
  ली नाचा शानदार विजय
  आक्रमक खेळीच्या बळावर महिला एकेरीत आघाडीवर असलेली सहावी मानांकित ली ना हिने उपांत्यपूर्व फेरीत विजयी आघाडी घेतली. फ्रेंच ओपनमध्ये चौथ्या मानांकित अझारेंकाला 7-5, 6-2 गुणांच्या आघाडीने पराभवाची धूळ चारून ली ना हिने ऐतिहासिक विजय संपादन केला.
  नदालचीही उपांत्य फेरीत धडक
  जगातला पुरुष एकेरीचा नंबर वनचा खेळाडू राफेल नदालने विजयी कामगिरी कायम ठेवताना आज पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली. नदालने स्वीडनच्या रॉबिन सोडरलिंगला 6-4, 6-1, 7-6 ने पराभूत केले. ही लढत त्याने अवघ्या 74 मिनिटांत जिंकली. उपांत्य सामन्यात आता नदालची लढत इंग्लंडचा स्टार खेळाडू अँण्डी मरेशी होईल.

  उद्या नदाल विरुद्ध जोकोविच
  जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या नदाल व जोकोविच या जोडीची लढत शुक्रवार, 3 जून रोजी होणार आहे. विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जाणारी ही जोडी पुरुष एकेरीतील आव्हान राखून ठेवण्यासाठी लढणार आहे.

Trending