आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • French Open Tennis, Sharapova And Azanreka In Final

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा; अझारेंका, शारापोवा उपांत्य फेरीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस- दुसर्‍या मानांकित मारिया शारापोवा व तिसरी मानांकित व्हिक्टोरिया अझारेंकाने बुधवारी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. रशियाच्या शारापोवाने 18 व्या मानांकित जेलेना यांकोविकला 0-6, 6-4, 6-3 अशा फरकाने पराभूत केले. सर्बियाच्या यांकोविकने पहिला सेट 29 मिनिटांत जिंकला होता. तिने या सेटमध्ये शारापोवाची सर्व्हिस ब्रेक केली. तसेच रशियाच्या खेळाडूला एकही गेम जिंकू दिला नाही. मात्र, त्यानंतर शारापोवाने दमदार पुनरागमन केले. तिने सरळ दोन सेटमध्ये बाजी मारून अंतिम चारमधील प्रवेश निश्चित केला.

नदाल, योकोविक अंतिम चारमध्ये
नोवाक योकोविकने टॉमी हासला 6-3,7-6,7-5 अशा फरकाने पराभूत केले. दुसरीकडे स्पेनच्या राफेल नदालने वावरिंकाचा 6-2,6-3,6-1 ने पराभव केला. नदाल-योकोविक यांच्यात उपांत्य लढत होईल.

अझारेंकाची मारिया किरिलेंकोवर मात
अझारेंकाने रशियाच्या मारिया किरिलेंकोला 7-6, 6-2 अशा फरकाने पराभूत केले. किरिलेंकोने पहिला सेट ट्रायब्रेकरपर्यंत खेचला होता. मात्र, अझारेंकाने हा सेट जिंकून आघाडी घेतली. तिने 76 मिनिटांत रशियाच्या खेळाडूचे आव्हान संपुष्टात आणले. तिने या लढतीत 25 विनर्स मारले.