वर्ल्डकपमध्ये यंदा पदार्पण करणारे खेळाडू धूम करण्यास सज्ज आहेत. वर्ल्डकपच्या प्रोमोत सचिन तेंडुलकर म्हणतो, "मी कधीही ३४ हजार धावा काढण्याचे स्वप्न पाहिले नाही. १०० शतके किंवा पहिल्या द्विशतकाचेसुद्धा नाही. माझे फक्त एकच स्वप्न होते, विश्वचषक जिंकण्याचे.' रोहित शर्मासारख्या बऱ्या च ताऱ्यांना या वेळी
आपले स्वप्न खरे करण्याची संधी मिळेल. विश्वचषकात पहिल्यांदाच खेळणारे काही खेळाडू आम्ही निवडले आहेत. त्यांच्यावर प्रथमच कोट्यवधींच्या आशेचा मोठा दबाव असेल.
रोहित शर्मा (भारत)
चार वर्षांपूर्वी
टीम इंडिया चॅम्पियन बनली त्या वेळी रोहितसुद्धा जल्लोषात सामील होता. मात्र, चॅम्पियन म्हणून नव्हे. या चार वर्षांत त्याच्या मानसिक आणि शारीरिक दोन्ही स्वरूपात खूप बदल झाला आहे. आता तो असा सलामीवीर आहे, जो डाव सावरतो, सांभाळतो आणि विरोधी गोलंदाजांना बदडून रडवतोसुद्धा. २७ वर्षीय मुंबईकर जगात असा एकमेव खेळाडू आहे, ज्याने वनडेत दोन द्विशतके ठोकली आहेत. २००७ मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या या खेळाडूला वर्ल्डकपसाठी खूप वाट बघावी लागली. तो तमाम भारतीयांचे आशास्थान आहे.
पुढील स्लाइड्वर जाणून घ्या कोण आहेत, इतर 9 Cricketer's