आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Friendship Day Murali Vijay Betrayed Friend Karthik News In Marathi

'दोस्‍त दोस्‍त ना रहा', दिनेश कार्तिकच्‍या पत्‍नीसोबत होते मुरली विजयचे अफेअर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोओळ - कार्तिक पहिली पत्‍नी निकितासोबत)

नुकताच फ्रेंडशिप डे मोठ्या उत्‍साहात पार पडला. जीवाला जीव देणारे मित्र म्‍हणून कित्‍येकांनी एकमेकांना साथ देण्‍याच्‍या आणभाका घेतल्‍या असतील. परंतु जेव्‍हा मित्र अशी गोष्‍ट करतात की, ज्‍यामुळे मैत्रीत दुरावा निर्माण होतो. अशीच गोष्ट क्रिकेटपटू मुरली विजय आणि दिनेश कार्तिकची आहे. मुरली विजयचे दिनेशच्‍या पत्‍नीशी अफेअर असल्‍याने दोघांमध्‍ये कायमची कटूता निर्माण झालेली आहे.

क्रिकेटपटू मुरली विजय सध्‍या इंग्‍लड दौ-यावर कमाल करत आहे. आपल्‍या परिवारासोबत आनंदी दितस आहे. त्‍यामागे त्‍याची पत्‍नी निकिता आहे. निकिता पूर्वी दिनेश कार्तिकची पत्‍नी होती.
मित्र बनले शत्रू
दिनेश आणि विजय दोघेही तामिळनाडू संघाकडून क्रिकेट खेळत होते. दिनेशने आपल्‍या लहानणीची मैत्रीण निकिताशी विवाह केला. ती गरोदर होती. दिनेशही खूप आनंदी होता. पण त्‍याचा आनंद जास्‍त काळ टिकू शकला नाही. निकिताचे मुरली विजयसोबत अफेअर सुरु होते.
नि‍किताने हा आपल्‍या अफेअरचा खुलासा करताच कार्तिकने तिला फारकत दिली. फारकत घेताच निकिताने मुरली विजयसोबत लग्‍न केले. अलग झाल्‍यानंतर कार्तिकने मुलावर हक्‍क दाखविला नाही. त्‍यानेही दुसरे लग्‍न केले.
निकिता आज मुरली विजयसोबत आनंदी आहे. तर कार्तिकसुध्‍दा दीपिकासोबत आनंदी आहे.

पुढील स्‍लाइडवर वाचा, क्रिडाजगतातील एकेकाळी मित्र पण आता कट्टर शत्रू झालेल्‍या खेळाडूंविषयी...