आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत आजपासून रंगणार महिला विश्‍वचषक क्रिकेट!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आयसीसी महिला विश्‍वचषकाला आज गुरूवार(ता. 31) पासून भारत-वेस्ट इंडीज सामन्याने सुरुवात होत आहे. या स्पर्धेत जगभरातील आठ संघ सहभागी होत आहेत. यात पाच वेळेसची विजेता ऑ स्ट्रेलिया, तीन वेळेसची चॅम्पियन इंग्लंड, एक वेळेसची विजेती न्यूझीलंड आणि मागच्या वेळी तिस-या स्थानी असलेल्या भारतीय टीमचा समावेश आहे. वानखेडेवर रणजी आणि इराणी करंडकाचे सामने असल्यामुळे महिला वर्ल्डकपचे मैदान बदलण्यात आले होते. आता हे सामने मुंबईतील तीन मैदानांवर आणि कटकच्या दोन मैदानांवर होतील. महिलांची ही दहावी विश्वचषक स्पर्धा आहे.

महिला वर्ल्डकपच्या ब गटात पाकिस्तानची टीम आहे. पाकिस्तान टीमच्या विरोधात देशभर चाहत्यांनी आवाज बुलंद केल्याने या वेळी ही स्पर्धा चर्चेचे केंद्रबिंदू ठरली आहे. पाकिस्तानची टीम कटकच्या बारबती स्टेडियमवर थांबलेली आहे. भाजप, शिवसेना आणि बजरंग दलाकडून पाकिस्तान टीमला भारतात खेळण्यास विरोध असल्याने पाक टीमची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

भारताची चांगली तयारी
अ गटात सामील भारतीय संघाची तयारी चांगली झाली आहे. मुंबईत 28 जानेवारी रोजी न्यूझीलंडविरुद्ध सराव लढतीत भारताची कामगिरी चांगली होती. ती लढत 8 गड्यांनी जिंकली. भारतीय कर्णधार मिताली राजच्या नेतृत्वात टीमचा आत्मविश्वास बुलंदीवर आहे. संघात पूनम राऊत, तिरुष कामिनी, हरमनप्रीत आणि मिताली यांच्यावर फलंदाजीची मदार असेल. निरंजना, रिमा मल्होत्रा आणि मोना मेशराम यांच्यावर मधल्या फळीत धावा काढण्याची जबाबदारी आहे. गोलंदाजीत अमिता शर्मा, गौहर सुलताना, रसनारा परवीन आणि झुलन गोस्वामी तसेच एकता बिष्ट या सज्ज आहेत.


विंडीज टीम देऊ शकते आव्हान
भारताचा पहिला सामना वेस्ट इंडीजशी आहे. वेस्ट इंडीजकडून कर्णधार मॅसेरा एग्युलेरा, डिंड्र डोरिन आणि शकिरा सेल्मन फलंदाजीत, तर शेनल डेली, स्टिफनी टेल आणि सबरिना मुनरो गोलंदाजीत दमदार कामगिरी करण्यास सक्षम आहेत.


मुंबईच्या तीन मैदानांवर होतील सामने :
1. ब्रेबॉर्न स्टेडियम.
2. एमआयजी मैदान.
3. बांद्रा-कुर्ला
कॉम्प्लेक्स मैदान.

कटक येथे होतील दोन सामने :
1. बारबती स्टेडियम.
2. ड्रिस ग्राउंड.


सहभागी महिला संघ
अ गट - इंग्लंड, भारत, वेस्ट इंडीज, श्रीलंका.
ब गट - ऑ स्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका.


17 फेब्रुवारीला मुंबईत फायनल
तब्बल 18 दिवस रंगणा-या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा फायनल मुकाबला 17 फेब्रुवारीला होईल. मुंबईच्या सीसीआय मैदानावर या खास सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पुण्याची लिसा ऑस्ट्रेलिया टीममध्ये
मूळ पुण्याची असलेली लिसा स्थळेकर वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया टीमकडून खेळणार आहे. रविवारी ऑस्ट्रेलिया महिला संघाची घोषणा करण्यात आली. जोडिले फील्ड ही ऑस्ट्रेलियाच्या 15 सदस्यीय टीमचे नेतृत्व करणार आहे.

ऑस्ट्रेलिया प्रबळ दावेदार
2012 मधील टी-20 वर्ल्डकप विजेता टीम आणि पाच वेळेसची चॅम्पियन ऑस्ट्रेलिया या वेळीसुद्धा विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. ब गटातून ही टीम सुपर लीगमध्ये सहज क्वालिफाय होईल, असे बोलले जात आहे.

विजयी प्रारंभ करू
वर्ल्डकपमध्ये आम्ही वेस्ट इंडीजविरुद्ध विजयी प्रारंभ करू. आम्ही खूप मेहनत घेतली आहे. आपल्या भूमीवर कमाल करण्याची ताकद आमच्याकडे आहे.’
मिताली राज, कर्णधार, टीम इंडिया

आमचेही प्रयत्न
भारतीय टीमची कामगिरी चढ-उताराची राहिली आहे. उद्घाटनच्या सामन्यात विजय मिळवण्याचा आमचा जोरदार प्रयत्न असेल. आमची टीम चांगली आहे.’
मॅसेरा एग्युलेरा, कर्णधार, वेस्ट इंडीज.

वर्ल्डकपचे वेळापत्रक
दिनांक सामना स्थळ
31 जानेवारी भारत वि. इंग्लंड मुंबई
1 फेब्रुवारी ऑस्ट्रेलिया वि. पाक कटक
1 फेब्रुवारी इंग्लंड वि. श्रीलंका मुंबई
3 फेबु्रवारी ऑस्ट्रेलिया वि. द. आफ्रिका कटक
3 फेब्रुवारी भारत वि. इंग्लंड मुंबई
3 फेब्रुवारी न्यूझीलंड वि. पाक कटक
3 फेब्रुवारी श्रीलंका वि. वेस्ट इंडीज मुंबई
5 फेब्रुवारी पाक वि. द. आफ्रिका कटक
5 फेब्रुवारी ऑ स्ट्रेलिया वि. न्यूझीलंड कटक
5 फेब्रुवारी भारत वि. श्रीलंका मुंबई
6 फेब्रुवारी इंग्लंड वि. वेस्ट इंडीज मुंबई
7 फेब्रुवारी अ-4 वि. ब-4 कटक
8 फेब्रुवारी अ-1 वि. ब-1 मुंबई
8 फेब्रुवारी अ-2 वि. ब-2 मुंबई
8 फेबु्रवारी अ-3 वि. ब-3 कटक
10 फेब्रुवारी अ-2 वि. ब-1 मुंबई
10 फेब्रुवारी अ-1 वि. ब-3 कटक
11 फेब्रुवारी अ-3 वि. ब-2 मुंबई
13 फेबु्रवारी अ-3 वि. ब-1 मुंबई
13 फेबु्रवारी अ-2 वि. ब-3 कटक
13 फेबु्रवारी अ-1 वि. ब-2 मुंबई
15 फेब्रुवारी पाचव्या स्थानासाठी प्ले ऑफ कटक
15 फेब्रुवारी तिस-या स्थानासाठी प्ले ऑफ मुंबई
17 फेबु्रवारी फायनल मुंबई