आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL-10 चा चॅम्पियन मुंबईवर पैशांचा पाऊस; कोणत्या क्रिकेटपटूला कोणता मिळाला अवॉर्ड?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सने रायझिंग पुणे सुपरजायंट्सला पराभूत करून आयपीएल-१० चे विजेतेपद पटकावले. - Divya Marathi
अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सने रायझिंग पुणे सुपरजायंट्सला पराभूत करून आयपीएल-१० चे विजेतेपद पटकावले.
हैदराबाद- अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमांचक लढतीत मुंबई इंडियन्सने रायझिंग पुणे सुपरजायंट्सला पराभूत करून आयपीएल-१० चे विजेतेपद पटकावले. मुंबई इंडियन्सचे हे तिसरे विजेतेपद ठरले. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १२९ धावा काढल्या. पुणे हे लक्ष्य सहज गाठेल, असे वाटत होते. मात्र, मुंबईने शानदार गोलंदाजी करून पुण्याला अवघ्या १२८ धावांत रोखून थरारक विजय मिळवला.
 
कर्णधार स्मिथचे अर्धशतक वाया-
 
- विजयासाठी आवश्यक १३० धावांचा पाठलाग करताना पुण्याकडून कर्णधार स्मिथने सर्वाधिक ५१ धावा काढल्या. 
- त्याच्याशिवाय सलामीवीर अजिंक्य रहाणेने ४४ धावा काढल्या. धोनी १० धावाच काढू शकला. इतरांनी निराशा केली. 
- मुंबईकडून मिशेल जॉन्सनने अवघ्या ४ षटकांत २६ धावांत ३ गडी बाद केले. त्याने १० चेंडू निर्धाव टाकले. बुमराहने २६ धावांत २ गडी बाद केले.
- तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईची सुरुवात अत्यंत गचाळ झाली. 
- सलामीवीर पार्थिव पटेल (४) आणि एल. सिमन्स (३) यांना वेगवान गोलंदाज जयदेव उनादकटने बाद केले. 
- ८ धावांत २ विकेट पडल्यानंतर रोहित शर्मा-अंबाती रायडू यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी केली. 
- यानंतर दोघेही अनुक्रमे २४ आणि १२ धावा काढून बाद झाले. दोन वेळेसची चॅम्पियन मुंबई ६५ धावांत ५ विकेट अशी संकटात सापडली होती.
- पोलार्ड (७) आणि हार्दिक पंड्या (१०) यांनीही मैदानावर केवळ हजेरी लावण्याचे काम केले. 
- सात विकेट पडल्यानंतर कृणाल पंड्याने एकाकी झुंज देताना अवघ्या ३८ चेंडूंत २ षटकार, ३ चौकारांसह ४७ धावा काढत मुंबईला शंभरी ओलांडून दिली.
- अवघ्या १२९ धावा काढताना मुंबईच्या तोंडाला फेस आला होता. पुण्याकडून जयदेव उनादकटने २ विकेट, अॅडम झम्पाने २ विकेट आणि डॅनियल क्रिस्टियनने ३४ धावांत २ विकेट घेतल्या.
 
असा होता अखेरच्या षटकातील रोमांच-

- पुण्याला अखेरच्या षटकात जॉन्सनच्या गोलंदाजीवर ६ चेंडूंत विजयासाठी १३ धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर तिवारीने चौकार मारला. पुढच्या दोन चेंडूवर तिवारी, स्मिथ बाद झाले. 
- चौथ्या चेंडूवर सुंदरने एक धाव घेतली. अखेरच्या दोन चेंडूवर क्रिस्टियनने प्रत्येकी २ धावा घेतल्या. या षटकात ४, विकेट, विकेट, १, २,२ अशा धावा निघाल्या.
 
दोन्ही संघावर पडला पैशांचा पाऊस-
आयपीएल-10 च्या अंतिम लढतीनंतर विजेत्या आणि उपविजेत्या संघावर पैशांचा पाऊस पडला. विजेत्या संघाला म्हणजेच मुंबई इंडियन्सला 15 कोटी रुपये बक्षिस म्हणून मिळाले तर, उपविजेत्या रायजिंग पुणे सुपरजाइंटला 10 कोटी रुपये मिळाले. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार 47 धावा काढणा-या क्रुणाल पंड्याला दिला गेला ज्यात त्याला 5 लाख रुपये दिले गेले.. 
 
पुढे स्लाईडद्नारे वाचा, गौतम गंभीर, युवराज, सुरैश रैना यांच्यासह इतर कोणत्या कोणत्या खेळाडूंना मिळाला अवॉर्ड...
 
आयपीएल अंतिम सामन्याबाबतच्या बातम्या खाली ही वाचा....
बातम्या आणखी आहेत...