आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटमधील हे FUNNY MOMENTS बघून तुम्हीही हसाल पोटधरुन !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेट असा खेळ आहे की क्षणात याचे पारडे कुठे झुकेल काही सांगता येत नाही. एखादा संघ सामना जिंकतोय असं वाटत असतानाच अचानक असे काही बदल होतात की जिंकणारा संघ पराभूत होतो. त्‍यामुळे या खेळाला अनिश्‍चततेचा खेळ म्‍हटले जाते. एक चेंडू आणि त्‍यामागे लागलेले 22 खेळाडू आणि त्‍यांना पाहणारा कोट्यवधींचा प्रेक्षकवर्ग. यामुळे साहजिकच खेळाडूंवर तणाव असणारच. या तणावाचा असा परिणाम होतो की, कधी कधी अव्‍वल क्षेत्ररक्षकही झेल सोडतो किंवा चांगला फलंदाजही शून्‍यावर बाद होतो.

तुम्‍ही नुसता विचार करा, वानखेडेच्‍या मैदानात तुम्‍ही गोलंदाजी किंवा फलंदाजी करताय. स्‍टेडिअममध्‍ये हजारो प्रेक्षकांचा गलबला सुरू आहे. त्‍याचवेळी कोट्यवधी प्रेक्षक आपल्‍या घरी बसून टीव्‍हीवर सामना पाहत आहे. काय असेल तुमची स्थिती ? नुसती कल्‍पना करा ! अशावेळी तुमच्‍या चेह-यावर हास्‍याचा लवलेशही सापडणार नाही. परंतु, अनेकवेळा असे किस्‍से घडतात की या गंभीर प्रसंगीही चुकीने विनोद निर्माण होतो, आणि क्षर्णाधात काही मिनिटांसाठी तर हे खेळाडू आपला तणाव विसरून जातात. काहीवेळेस असेही होते की मैदानात वातावरण गंभीरच असते. पण पाहाणा-यांना मात्र तो एक विनोदी प्रसंग होऊन जातो.

क्रिकेटमध्‍ये तर असे अनेक किस्‍से घडले आहेत. ज्‍यामुळे हास्‍याची निर्मिती झाली. कधी खेळाडूंच्‍या जोशामुळे तर कधी चुकून झालेल्‍या कृत्‍यामुळे तर कधी कधी काही खेळाडूंनी मुद्दाम आपल्‍या वर्तनाने विनोद निर्माण केले आहेत. या विनोदामुळे काही क्षणांकरितातरी खेळाडूंचा तसेच प्रेक्षकांच्‍या मनावरील ताणही थोडासा हलका होऊन जातो. आपणही आपल्‍यावर आलेल्‍या आठवडयाभराचा ताणतणाव ही दृश्‍ये पाहून घालवण्‍याचा प्रयत्‍न करू यात. क्रिकेटमधील FUNNY MOMENTS पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्सला...