Home | Sports | Expert Comment | Funny Social Media Reactions On India Vs Pak Match, In Women Cricket World Cup

महिला वर्ल्ड कपमध्ये भारताचा पाकवर मोठा विजय, सोशल मिडियात आल्या या कमेंट्स

दिव्यमराठी वेब टीम | Update - Jul 03, 2017, 10:06 AM IST

डावखुरी फिरकीपटू एकता बिष्टच्या घातक गोलंदाजीच्या बळावर भारताने महिला विश्वचषकात पाकिस्तानला ९५ धावांनी हरवले.

 • Funny Social Media Reactions On India Vs Pak Match, In Women Cricket World Cup
  स्पोर्ट्स डेस्क- ICC महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये रविवारी भारताने पाकिस्तानला 95 धावांनी हरविले. टूर्नामेंटमधील हा भारताचा सलग तिसरा विजय आहे. सोबतच गुणतालिकेत द. आफ्रिकेला मागे टाकत टीम इंडिया अव्वलस्थानी पोहोचली आहे. भारतीय टीमच्या विजयानंतर सोशल मीडियात इंडियन फॅन्सनी हा विजय जोरदार सेलिब्रेट केला. तसेच वेगवेगळ्या मजेदार कमेंट्स करत भारतीय महिला टीमला शुभेच्छा दिल्या आणि पुरूष टीमची खिल्ली उडविली. काही फॅन्सनी या विजयानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीतील मेन्स टीमला मिळालेल्या पराभवाचा बदला घेतल्याचे सांगितले. एकता बिष्टचे पाकला धक्के...
  - डावखुरी फिरकीपटू एकता बिष्टच्या (१८ धावांत ५ विकेट) घातक गोलंदाजीच्या बळावर भारताने महिला विश्वचषकात पाकिस्तानला ९५ धावांनी हरवले.
  - या विजयासह भारताने स्पर्धेत विजयी हॅट्ट्रिक केली. भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद १६९ धावांचा सामान्य स्कोअर केला.
  - यानंतर भारतीय गोलंदाजांनी कमाल प्रदर्शन करताना पाकला ३०.१ षटकांत ७४ धावांत गुंडाळले.
  टीम इंडिया अव्वल स्थानी-
  - भारताचा हा सलग तिसरा विजय असून गुणतालिकेत द. आफ्रिकेला मागे टाकत टीम इंडिया अव्वलस्थानी पोहोचली आहे.
  - दुसरीकडे पाकिस्तानला सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. एकताने करिअरमध्ये दुसऱ्यांदा वनडेत ५ विकेट घेतल्या. तिने दोन्ही वेळेस ही कामगिरी पाकिस्तानविरुद्धच केली, हे विशेष.
  - भारतीय महिला संघ आता गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध पुढचा सामना खेळेल.
  - धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात अत्यंत गचाळ झाली. पाकने अवघ्या १५ षटकांत २६ धावांत ५ विकेट गमावल्या होत्या. एकताने यातील ३ विकेट घेतल्या.
  - पाकिस्तानच्या चार महिला फलंदाज शून्यावर बाद झाल्या. पाकिस्तानची नववी विकेट ५१ च्या स्कोअरवर पडली.
  - यानंतर पाकची कर्णधार सना मीरने भारताला विजयासाठी प्रतीक्षा करण्यास भाग पाडले.
  - अखेरीस मानसी जोशीने सनाला बाद करून आपली दुसरी विकेट घेतली. सनाने २९ धावा काढण्यासाठी ७३ चेंडू घेतले.
  - मानसीने ९ धावांत २ गडी बाद केले. झुलन गोस्वामी, दीप्ती शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
  चांगल्या सुरुवातीनंतरही भारताचे माफक लक्ष्य-
  - तत्पूर्वी, भारतीय महिला संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १६९ धावा काढल्या.
  - भारताने २३ षटकांत १ बाद ७४ धावा अशी चांगली सुरुवात केली होती. मात्र, पूनम राऊत (४७) बाद झाल्यानंतर भारताचा रनरेट कमी झाला.
  - यानंतर एकेक फलंदाज बाद झाले. दीप्ती शर्माने २८ आणि सुषमा वर्माने ३३ धावांचे योगदान दिले.
  - झुलन गोस्वामीने १४ तर हरमनप्रीत कौरने १० धावा काढल्या. सलग आठ अर्धशतके काढणारी मिताली राज या सामन्यात केवळ ८ धावा काढून बाद झाली. स्मृती मानधना २ धावा काढू शकली.
  - पाकिस्तानकडून लेफ्ट आर्म स्पिनर नशरा संधूने आपली सर्वश्रेष्ठ गोलंदाजी करताना २६ धावांत ४ गडी बाद केले. सादिया युसूफने ३० धावांत २ विकेट घेतल्या.
  पुढे स्लाईडद्वारे वाचा, भारताच्या मोठ्या विजयानंतर काय काय आल्या कमेंट्स...

Trending