आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ख्रिस गेल व सॅम्युअल्सच्या शतकी खेळीने विंडीज विजयी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किंगस्टन- शतकवीर ख्रिस गेल (124) आणि मार्लोन सॅम्युअल्स (नाबाद 101) यांच्या शतकी खेळीनंतर गोलंदाजांच्या दमदार प्रदर्शनाच्या बळावर वेस्ट इंडीजने मालिकेतील दुसºया वनडेत न्यूझीलंडवर 55 धावांनी मात केली. वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 315 धावा काढल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडला सर्वबाद 260 धावाच काढता आल्या.
फ्लोरिडा येथील दोन टी-20 सामने आणि पहिल्या वनडेत सलग तीन अर्धशतके ठोकल्यानंतर गेलने दुसºया वनडेतही प्रेक्षकांचे मनोरंजन करताना तुफानी खेळी केली. 12 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर गेलच्या खेळीने चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी दिली. गेलने अवघ्या 107 चेंडूंचा सामना करताना 125 धावा ठोकल्या, तर सॅम्युअल्सने 103 चेंडूंत 101 धावा काढून वेस्ट इंडीजला 5 बाद 315 धावांचा स्कोअर उभा करून दिला. गेलने आपल्या खेळीत तब्बल 9 षटकार आणि 8 चौकार मारून न्यूझीलंडच्या गोलंदाजीतील हवाच काढून टाकली. सॅम्युअल्सने आपल्या खेळीत 1 षटकार आणि 7 चौकार मारले. धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून मार्टिन गुप्टील (51), केन विल्यम्सन (58) आणि बी. जे. वॉटलिंग (72) यांनी अर्धशतके ठोकली. मात्र, इतर फलंदाजांचे अपयश संघाला भोवले. विडींजकडून नारायणने 45 धावांत 2, सॅॅम्युअल्सने 46 धावांत 2, तर रामपॉलने 50 धावांत 3 विकेट घेतल्या. न्यूझीलंडचा डाव 260 धावांतच आटोपला.
संक्षिप्त धावफलक - वेस्ट इंडीज 5 बाद 315. (गेल 125, सॅम्युअल्स 101, 3/55 टीम साऊथी) वि. वि. न्यूझीलंड 47 षटकांत सर्वबाद 260. (गुप्टील 51, विल्यम्सन 58, वॉटलिंग 72, 3/50 रामपॉल, 2/45 नारायण)