आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कसोटी कर्णधारपद स्वीकारण्यास तयार : गंभीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आगामी काळात भारतीय कसोटी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे गौतम गंभीरने स्पष्ट केले. कसोटीत सलगच्या अपयशामुळे घसरलेला संघाचा दर्जा सुधारण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असेही तो म्हणाला. मध्यंतरी वारंवार होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना धोनीने सक्षमपणे नेतृत्व सांभाळणारा पर्याय मिळाल्यास आपण कर्णधारपद सोडण्यास तयार असल्याचे म्हटले होते. यामुळे गंभीरने केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

‘आव्हानाचा सामना करणे मला आवडते. या आव्हानामुळे माझ्यातील नेतृत्वगुण विकसित झाला आहे. यामुळे आगामी काळात कोणत्याही प्रकारची जबाबदारी दिली तर ती यशस्वीपणे पार पाडू शकतो, असेही तो म्हणाला.