आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gambhir Cuts Short County Stint Due To Family Reasons

खराब फॉर्मशी झगडत असणा-या गंभीरने घेतली कौंटीमधूनही माघार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- फलंदाजीत सातत्‍याने अपयशी ठरत असणा-या गौतम गंभीरने आपला जुना फॉर्म परत यावा म्‍हणून कौंटी संघाकडून खेळण्‍यास सुरूवात तर केली खरी. पण तिथेही त्‍याला अपयशाचा सामना करावा लागला. पहिल्‍या दोन्‍ही सामन्‍यात धावा काढू न शकलेल्‍या गंभीरने आता कौटुंबिक कारण सांगत कौंटी सामन्‍यातून काढता पाय घेतला आहे. मात्र, इसेक्‍सला तो लवकरच संघात परत येईल अशी आशा आहे.

गौतम गंभीर रविवारीच कौटुंबिक कारणामुळे भारतात परतल्‍याचे इसेक्‍सच्‍या निवेदनात सांगण्‍यात आले आहे. दोघांकडून अधिक जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न केला असता, माहिती मिळू शकली नाही.

गंभीरला इसेक्‍स क्रिकेटचा पूर्ण पाठिंबा असून 2013च्‍या हंगामा अखेरीपर्यंत तो पुन्‍हा संघात परतेल असा आशावादही त्‍यांनी व्‍यक्‍त केला आहे.