आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनच्‍या महाशतकापेक्षा भारताचा विजय महत्‍वाचा- गंभीर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऍडिलेड- सचिन तेंडुलकरच्‍या महाशतकापेक्षा संघाचा विजय महत्‍वाचा असल्‍याचे टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने म्‍हटले आहे. ऑस्‍ट्रेलियाविरूद्ध सुरू असलेल्‍या मालिकेत विक्रमापेक्षा 0-3 ने पिछाडीवर असल्‍याचे दुख:च जास्‍त सलत आहे. टीम इंडियाने आतापर्यंत ऑस्‍ट्रेलिया दौ-यात खराब कामगिरी केली आहे. परंतु, येणा-या काही दिवसात टीम इंडियात बदल होण्‍याची शक्‍यता आहे, त्‍यामुळे भारतीय संघातील हरवलेला फॉर्म परत येऊ शकतो, असाही विश्‍वास त्‍याने व्‍यक्‍त केला.

ऑस्‍ट्रेलियामध्‍ये सुरू असलेल्‍या चार सामन्‍यांच्‍या मालिकेत भारतीय संघाला नामुष्‍कीजनक पराभवाचा सामना करावा लागत आहे. मालिकेतील दोन सामन्‍यांत तर भारताला डावाने पराभव स्विकारावा लागला आहे. शेवटचा चौथा सामना 24 जानेवारीपासून ऍडिलेड येथे खेळला जाणार आहे.
यापूर्वी पाकिस्‍तानचा माजी कर्णधार इमरान खान यानेही टीम इंडियाला सचिनच्‍या शंभराव्‍या शतकापेक्षा संघाला विजयाच्‍या मार्गावर येणे आवश्‍यक असल्‍याचे म्‍हटले होते. परंतु, सचिन आपले शंभरावे शतक निश्चितपणे पूर्ण करेल, अशी आशाही त्‍याने व्‍यक्‍त केली. तसेच भारतीय संघात सध्‍या असलेल्‍या युवा खेळाडूंपैकी एकही कसोटीसाठी लायक नसल्‍याचेही तो म्‍हणाला होता. पराभवामुळे टीकेचे लक्ष्‍य बनलेली टीम इंडिया आता परदेशी माध्‍यमांच्‍या थट्टेचा विषय बनली आहे.
वासिम अक्रमने उडवली भारतीय संघातील वरिष्‍ठांची थट्टा
एडीलेडमध्‍ये सचिन खेळणार \'टॉप गिअर\'मध्‍ये!
मी शंभराव्या शतकाच्या विचारात नाही : सचिन