मैदानात ओपनिंगसाठी उतरातना गंभीर-सेहवाग
बिलासपुर(हिमाचल प्रदेश) – लुहणूमध्ये खेळल्या गेलेल्या 'हिमाचल रणजी ट्रॉफी'मधील एकदिवसीय सामन्यात जम्मू काश्मिर संघाने दिल्ली संघाचा 2 विकेटने पराभव केला. परंतु जेव्हा
गौतम गंभीर आणि
वीरेंद्र सेहवाग मैदानावर उतरले त्यावेळी मैदानात चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले होते.
सामन्याचे उद्घाटन नयनादेवीचे आमदार रणधीर शर्मा यांच्या हस्ते झाले. जम्मू काश्मिर संघाचा कर्णधार परवेज रसूलने नाणेफेक जिंकून दिल्ली संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग सारख्या दिग्गजांनी सजलेला दिल्ली संघ अपेक्षेप्रमाणे कामगिरी करु शकला नसल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
सेहवागने 37 चेंडूत 1 चौकाराच्या सहाय्याने 11 धावा केल्या. गंभीर 36 धावांवर त्रिफळाचीत झाला.
पुढील स्लाइडवर पाहा, सामन्यादरमयानची छायाचित्रे...