आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅरी सोबर्सच्या \'त्या\' ऐतिहासिक पराक्रमाला 49 वर्षे पूर्ण! युवराजही या यादीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2016 साली  वेस्ट इंडिज दौ-यावर असताना विराट कोहलीने गॅरी सोबर्स यांची आर्वजून भेट घेतली होती. - Divya Marathi
2016 साली वेस्ट इंडिज दौ-यावर असताना विराट कोहलीने गॅरी सोबर्स यांची आर्वजून भेट घेतली होती.
स्पोर्ट्स डेस्क- वेस्ट इंडिजचे महान अष्टपैलू क्रिकेटर अशी ओळख राहिलेल्या गॅरी सोबर्स आता 82 वर्षाचे आहेत. गॅरी सोबर्स यांना क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान अष्टपैलू म्हणून त्यांना ओळखले जाते. याच गॅरी सोबर्स यांनी 49 वर्षापूर्वी यांनी 31 ऑगस्ट 1968 रोजी एकाच षटकात सहा षटकार ठोकण्याचा पराक्रम केला होता. तर आज आम्ही तुम्हाला गॅरी सोबर्स यांच्या पराक्रमाबाबत सांगणार आहोत. सोबर्स यांनी केला होता सर्वप्रथम सलग 6 चेंडूवर 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम...
 
- गॅरी सोबर्स यांचा जन्म बार्बाडोसमधील ब्रिजटाऊन येथे 28 जुलै 1936 रोजी झाला.
- गॅरी सोबर्स वेस्ट इंडिजकडून 1954 ते 1974 असे 20 वर्षे प्रदीर्घ काळ क्रिकेट खेळले.
- यादरम्यान त्यांनी वेस्ट इंडिजकडून 93 कसोटी सामने खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी 8 हजारांहून अधिक धावा केल्या तर 235 विकेट घेतल्या.
- कसोटीत 26 शतके ठोकताना नाबाद 365 अशी त्रिशतकाची खेळीही त्यांनी एकदा केली होती.
- सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्यांनी 40 हजाराहून अधिक धावा केल्या तर 1400 च्या घरात विकेट टिपल्या. तर 550 हून अधिक झेल टिपले. 
- त्याच्या काळात वन डे क्रिकेट जन्माला आले नव्हते. ते निवृत्तीच्या उंबरट्यावर असताना वन डे क्रिकेटचा शुभारंभ झाला होता.
- गॅरी सोबर्स आयुष्यात एकमेव असा वन डे सामना खेळले. मात्र ते शून्यावर बाद झाले. मात्र त्यांनी 1 गडी बाद केला होता.
- 31 ऑगस्ट 1968 रोजी फर्स्ट क्लास क्रिकेट खेळताना त्यांनी माल्कम नॅश याच्या गोलंदाजीवर एकाच षटकात 6 षटकार ठोकून क्रिकेट विश्वात एक विक्रम नोंदवला होता.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, गॅरी सोबर्स यांच्यानंतर कोणी कोणी मारलेत सलग 6 चेंडूवर 6 षटकार...
बातम्या आणखी आहेत...