आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gary Kirsten Joins South Africa As Consulant Ahead Of India Clash

गॅरी कर्स्टन यांनी दक्षिण आफ्रिकेसमोर मांडलीय टीम इंडियाची कमकुवत बाजू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न- विश्‍वचषक 2015 मध्ये पाकिस्‍तानला चारमुंड्या चित केल्यानंतर भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्‍हान असणार आहे. ही लढत 22 फेब्रुवारी रोजी होईल. उल्‍लेखनिय म्‍हणजे भारत विश्‍वचषकात दक्षिण आफ्रिकेसोबत कधीच जिंकलेला नाही. तसेच टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्‍टन सध्या दक्षिण आफ्रिकेला मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे गॅरी यांनी टीम इंडियाच्‍या कमकूवत बाजू आधीच आफ्रिकेसमोर मांडल्या असल्याची माहिती मिळाली आहे.
(फोटो - दक्षिण आफ्रिकेच्‍या संघाला प्रशिक्षण देताना गॅरी कर्स्‍टन आणि दक्षिण आफ्रिका संघाचे ट्वीट)

दोन दिवसांपूर्वी होते भारतात
गॅरी कर्स्टन यांच्‍या मार्गदर्शनाखाली भारताने भारताने विश्‍वचॅम्पियन होण्‍याचा मान मिळविला होता. दोन दिवसांपूर्वी ते भारतात होते. आयपीएलसाठी खेळाडूंच्‍या लिलावाच्‍या वेळी ते बंगळुरु येथ्‍ो उपस्थित होते.
कर्स्टनसोबत हसी आणि डोनाल्डसुध्‍दा
भारतासाठी वाईट गोष्‍ट ही आहे की, कर्स्‍टनसोबत ऑर्स्‍टेलियाचा माइक हसी आणि अॅलन डोनाल्‍डसुध्‍दा दक्षिण आफ्रिकन संघाला मदत करणार आहेत.
कर्स्टन-हसी-डोनाल्ड हे त्रिकूट पडू शकते भारी
गॅरी कर्स्टन आणि माइक हसी यांनी मिळून 26845 इंटरनेशनल रन केले आहेत. तर अॅलन डोनाल्‍ड यांनी 602 विकेट मिळविल्‍या आहेत. हे तिघेही दक्षिण आफ्रिकेचा कसून सराव करुन घेत आहेत.

जडेजाप्रमाणे करायला लावली गोलंदाजी
दक्षिण आफ्रिकेच्‍या सराव सत्रात ड्य‍ुमिनी, हाशिम आमला आणि डी कॉक यांना डाव्‍या हाताने फिरकी गोलंदाजी करायला सांगितले. रवींद्र जडेजा ज्‍या पध्‍दतीने गोलंदाजी करतो त्‍याच पध्‍दतीचे गोलंदाजीचे प्रशिक्षण दक्षिण आफ्रिकन संघाला दिले गेले आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, अनफिट स्टेन सामन्‍यामध्‍ये खेळणार की नाही