आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gary Kirsten Joins South Africa As Consulant Ahead Of India Clash

धोनी ब्रिगेडची दुबळी बाजू गॅरी आफ्रिकेला सांगणार; रविवारी भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न- दक्षिण आफ्रिकेची वर्ल्डकपसाठी यंदा जोरदार तयारी सुरू आहे. ते कसलीच उणीव सोडायला तयार नाहीत. रविवारी भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी संघ व्यवस्थापनाने भारताचे माजी कोच गॅरी कर्स्टन यांना सल्लागार म्हणून सामील केले आहे. कर्स्टन २००८ ते २०११ दरम्यान भारताचे कोच म्हणून कार्यरत होते. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मायकेल हसीसुद्धा आफ्रिकन संघासोबत सल्लागार म्हणून सामील झाला आहे. संघासोबत गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून अॅलन डोनाल्डसुद्धा आहेत. डेल स्टेनला फ्लू झाला असून, बुधवारी त्याने सराव केला नाही.

कर्स्टन का महत्त्वपूर्ण ?
गॅरी कर्स्टन यांच्या नेतृत्वाखाली भारताने २०११ चे वर्ल्डकप जिंकले होते. कर्णधार धोनी आणि संघाच्या रणनीतीबद्दल त्यांना चांगली माहिती आहे. याचा फायदा आफ्रिकेला होऊ शकतो.
हसी सांगेल परिस्थितीबाबत
मायकेल हसी ऑस्ट्रेलियातील मैदान, तेथील स्थितीबाबत आफ्रिकेला महत्त्वपूर्ण सूचना देऊ शकतो. आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली तो चेन्नई कडूनही खेळला आहे. धोनीच्या चाली त्याला माहिती आहे.

टीम इंडियाला शाळकरी मुलांनी दिली प्रॅक्टिस
भारतीय संघाने बुधवारी सराव केला. संघाच्या प्रमुख गोलंदाजांशिवाय १५ शाळकरी क्रिकेटपटना सराव सत्रादरम्यान गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. १५ सदस्यीय या ड्रीम टीमच्या एका सदस्याने म्हटले की, अशी संधी जीवनात एकदाच मिळते. ड्रीमच्या या मुलांची निवड संपूर्ण भारतातून २५०० पेक्षा अधिक क्रिकेटपटूंतून करण्यात आली. गोलंदाज भुवनेश्वरच्या फिटनेसबाबत चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याने शॉर्ट रनअपने गोलंदाजी केली. तो टाचेच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे.
या आगोदर कधी झाला आफ्रिकेविरोधाचा भारताचा पराभव वाचा पुढील स्‍लाईडवर...