आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'DAY: अवघ्‍या 18 दिवसांच्‍या गौतम गंभीरला आई-वडीलांनी दिले होते दत्तक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा स्‍टार सलामीवीर गौतम गंभीरचा आज 32वा वाढदिवस आहे. दिल्‍लीमध्‍ये गल्‍ली क्रिकेट खेळून मोठा झालेला गौतम भलेही आज टीमच्‍या बाहेर असला तरी त्‍याच्‍यामध्‍ये असलेली जिद्द त्‍याला पुढे जाण्‍याची प्रेरणा देत आहे.

आपल्‍या जिद्दीची चुणूक त्‍याने नुकताच वेस्‍ट इंडीज अ संघाविरूद्ध झालेल्‍या कसोटीत दाखवून दिली आहे. सातत्‍याने अपयशी ठरत असलेल्‍या गौतमच्‍या बॅटमधून अखेर धावांचा पाऊस पडला. त्‍याने 123 धावांची खेळी करून कसोटीमध्‍ये आजही आपण मोठी धावसंख्‍या करू शकतो, हे दाखवून दिले. यापूर्वी त्‍याने ब्रिस्‍टल येथे एसेक्‍स कौंटी टीमकडून खेळताना 106 धावा बनवल्‍या होत्‍या.

फटकेबाजी आणि आपल्‍या रागासाठी प्रसिद्ध असलेल्‍या गौतमच्‍या वैयक्तिक जीवनाविषयीची खूप कमी लोकांना माहिती आहे. अभ्‍यास सोडून कशापद्धतीने त्‍याने क्रिकेटला आपलेसे केले ? आयुष्‍यातील हा मोठा निर्णय घेण्‍यासाठी कोणत्‍या व्‍यक्‍तीने त्‍याला प्रेरणा दिली ? गौतमच्‍या 32व्‍या वाढदिनानिमित्त जाणून घेऊयात त्‍याच्‍या आयुष्‍याशी निगडीत काही पैलूंवर...
पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या गौतम गंभीरच्‍या वैयक्तिक आयुष्‍याशी निगडीत काही खास बाबी...