आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gautam Gambhir Not In ICC Twenty 20 World Indian Probables

Twenty-20 संभाव्‍य संघाची घोषणा- गौतम गंभीरचे करियर समाप्‍त ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी Twenty-20 विश्‍व करंडकासाठी संभाव्‍य 30 सदस्‍यीय भारतीय संघ निवडण्‍यात आला आहे. मात्र या संघातून गौतम गंभीर व पठान बंधू यांची नावे वगळण्‍यात आली आहेत.

16 मार्च रोजी होणा-या या सामान्यासाठी संभाव्‍य यादीमध्‍ये जेतेश्‍वर पुजारा व मुरली विजय यांचादेखील समावेश नाही. एकदिवसीय सामान्‍यातून बाहेर पडत असलेला युवराजसिंग याला मात्र लाईफलाइन देण्‍यात आली आहे.

आईसीसी Twenty-20 च्‍या 2007 या वर्षीचा वर्ल्‍ड कप जिंकणा-या भारतीय संघाचा पहिला मुकाबला प्रतिस्‍पर्धी पाकिस्‍तानसोबत होणार आहे. रणजी क्रिकेट सामान्‍यामध्‍ये चांगली कामगिरी करणा-या गौतम गंभीरला आपली निवड होईल, अशी अपेक्षा होती. परंतु गंभीरला मात्र 'गंभीर' होण्‍याची वेळ आली आहे. 2007 चा वर्ल्‍ड कप जिंकणा-या संघात असणा-या इरफान आणि युसुफ या पठाण बंधूंचाही या यादीमध्‍ये समावेश नसल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.


30 सदस्‍यीय संभाव्‍य भारतीय संघाची यादी-
शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, अजिंक्‍य रहाणे, अंबती रायुडू, महेंद्र सिंग धोनी, दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा, आर अश्विन, भुवनेश्‍वर कुमार, मोहम्‍मद शमी, इशांत शर्मा, विनय कुमार, स्‍टुअर्ट बिन्‍नी, मोहित शर्मा,केदार जाधव, युवराज सिंह, अमित मिश्रा, रजत भाटिया, संजू सैमसन,ईश्‍वर पांडे, उमेश यादव, उन्‍मुक्‍त चंद, मंदीप सिंह, हरभजन सिंह, वरूण आरोन, शाहबाज नदीम, पार्थिव पटेल आणि करण शर्मा.

गंभीरसोबत काय झाले वाचा पुढील स्‍लाईडवर ........