आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौतम गंभीर भारतीय संघात पुनरागमन करण्‍यास सज्ज !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - गौतम गंभीर सध्या भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. इराणी चषक क्रिकेट स्पर्धेत धडाकेबाज फलंदाजीसाठी सज्ज असल्याचे त्याने सांगितले. येत्या रविवारपासून इराणी चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत गौतम गंभीर हा शेष भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या टीमचा पहिला सामना रणजी चॅम्पियन कर्नाटकशी होईल. नुकताच कर्नाटक टीमने सातव्यांदा रणजी क्रिकेट स्पर्धेचा करंडक पटकावला आहे.
रेडबुल महाविद्यालयाच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमासाठी गौतम गंभीर आला होता. या वेळी त्याने भविष्यात भारतीय संघातील पुनरागमनाच्या विषयावर चर्चा केली. ‘भारतीय संघाबाहेर असल्याने काही टीकाकारांनी माझ्याबाबतीत अधिक चुकीचे मत निर्माण केले आहे. अशा लोकांना खेळाडूंच्या बाबतीत कोणतीही गोष्ट माहीत नसते. तरीही ते टीकाकार सल्ला देतात. मात्र, मी अशा टीकाकारांच्या सल्ल्याकडे कानाडोळा करतो,’असेही तो म्हणाला.
घरच्यांचा सर्वात मोठा पाठिंबा
कठीण प्रसंगी कोणीही साथ देत नाही. मात्र, अशा वेळी कुटुंबीयांचा पाठिंबा हा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा आधार असतो. याच पाठिंब्यामुळे तुम्ही खचून जाऊ शकत नाही. क्रिकेटच्या बाबतीतील सर्व गोष्टींची मी कुटुंबीयांसोबत चर्चा करतो. त्यामुळे तेदेखील मला काही वेळा चांगल्या पद्धतीने योग्य असे मार्गदर्शन करतात. हेच माझ्यासाठी महत्त्वाचे असते.
प्रबळ इच्छाशक्ती महत्त्वाची
पाठीच्या दुखापतीमुळे मागील दोन वर्षांपासून क्रिकेटपासून दूर असलेल्या वरुण अ‍ॅरोनने नुकतेच टीम इंडियात पुनरागमन केले. ‘प्रबळ इच्छाशक्ती असली की, यश निश्चित मिळते,’ असेही तो म्हणाला. त्याने न्यूझीलंडविरुद्ध वन डे मालिकेत 149 किमी प्रतितासाच्या वेगाने गोलंदाजी केली.
वरुण अ‍ॅरोनचीही खास उपस्थिती
न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारा वरून अ‍ॅरोनही महाविद्यालयाच्या कार्यक्रमाला उपस्थित होता. ‘न्यूझीलंडमधील खेळपट्ट्या या गोलंदाजीसाठी पोषक नव्हत्या. त्यामुळे समाधानकारक कामगिरी करता आली नाही, अशी प्रतिक्रिया त्याने दिली.