आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Gautam Gambhir Scores Hundred In Practice Match Against Australia

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सराव सामनाः गौतम गंभीरचा शतकी तडाखा, रोहित शर्माचेही अर्धशतक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्‍नई- पाहुण्‍या ऑस्‍ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्‍यात भारतीय संघातून डच्चू मिळालेल्‍या गौतम गंभीरने दमदार शतक ठोकून निवड समितीला इशाराच दिला. गौतम गंभीरने 3 षटकार आणि 13 चौकारांसह 112 धावांची तडाखेबाज खेळी केली.

गौतम गंभीरला ऑस्‍ट्रेलियाविरुद्ध मालिकेतून वगळण्‍यात आले आहे. परंतु, त्‍याला भारत 'अ' संघाचे कर्णधारपद देण्‍यात आले आहे. गंभीरने सराव सामन्‍यात मिळालेली संधी दवडली नाही. ऑस्‍ट्रेलियन गोलंदाजीवर हल्‍ला चढवित मोकळेपणाने फटकेबाजी केली. गंभीरने 3 वर्षांनी आंतरराष्‍ट्रीय गोलंदाजांविरुद्ध शतक ठोकले आहे. गंभीरची फलंदाजीची लय हरवली होती. त्‍याला सुरही सापडत नव्‍हता. त्‍यामुळेच त्‍याची हकालपट्टी करण्‍यात झाली. परंतु, शतक ठोकल्‍यामुळे निवड समितीला त्‍याचा निश्चितच विचार करावा लागेल.

दुसरीकडे, याच सामन्‍यात रोहित शर्मानेही दमदार अर्धशतक ठोकले. त्‍याने 3 षटकार आणि 8 चौकारांसह 77 धावा केल्‍या. शतक ठोकण्‍यात त्‍याला अपयश आले. त्‍यानंतर मनोज तिवारीनेही निवड समितीचे लक्ष वेधले आहे. त्‍यानेही अर्धशतकी खेळी केली.