आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gautam Gambhir Threatens To Quit Delhi Ranji Team Captaincy

संतापलेल्‍या गंभीरने अर्ध्‍यातच सोडली निवड समितीची बैठक, नेतृत्‍व सोडण्‍याची दिली धमकी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- दिल्‍ली आणि जिल्‍हा क्रिकेट संघाच्‍या निवड समितीची बैठक वादात अडकली. रणजी ट्रॉफीच्‍या पुढच्‍या सत्रासाठी झालेल्‍या बैठकीत टीमचा कर्णधार गौतम गंभीरने समितीचे अध्‍यक्ष चेतन चौहान यांच्‍या निर्णयावर नाराजी व्‍यक्‍त करीत मधूनच तो निघून गेला.

चेतन चौहान यांनी सिनिअर विकेटकिपर पुनीत बिष्‍टला बाहेर काढून राहुल यादवला संधी दिली होती. परंतु, गंभीरला ही गोष्‍ट रूचली नाही. नेतृत्‍व सोडण्‍याची धमकी देत गंभीर खोलीबाहेर गेला.

उल्‍लेखनीय म्‍हणजे, दिल्‍लीला पुढचा रणजी सामना संबलपूर येथे खेळला जाणार आहे. दिल्‍ली रणजी टीमने 2013/14च्‍या सत्रात आतापर्यंत एकूण चार सामने खेळले आहेत. 27 ऑक्‍टोबरचा झारखंडविरूद्धचा पहिला सामना रद्द झाला होता. त्‍यानंतर 7 नोव्‍हेंबरला गुजरात आणि 14 नोव्‍हेंबरला झालेला मुंबईविरूद्धचा सामना ड्रॉ झाला होता.

गेल्‍या 21 नोव्‍हेंबरला दिल्‍लीने हरियाणाला पराभूत करून या सत्रातील आपला विजय नोंदवला होता. फिरोजशाह कोटलमध्‍ये झालेल्‍या सामन्‍यात दिल्‍लीने हरियाणाला 105 धावांनी पराभूत केले. याच सामन्‍यात कर्णधार गंभीरने 153 धावांची खेळी केली होती. ईशांत शर्माने याच सामन्‍यात 9 विकेट घेऊन टीम इंडियाचे पुनरागमन केले. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा, निवड समितीच्‍या बैठकी झालं काय ?