आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL-8 : सात सामन्यांचे रिपोर्ट कार्ड, टॉप-5मध्ये गौतमसह हे 3 भारतीय खेळाडू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयपीएल-8चे सुरुवातीचे सात सामने खेळून झाले आहेत. आतापर्यंतच्या सामन्यांवर एक नजर टाकली तर परदेशी खेळाडूंपेक्षा भारतीय खेळाडूंचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. गौतम गंभीरने 2 सामन्यांमध्ये 115 धावा काढल्या आहेत. तो टॉप स्कोरर आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये गंभीरचे दोन अर्धशतक आहे. गौतम गंभीरशिवाय टॉप-5मध्ये रोहित शर्मा आणि अनुरीत सिंहसुध्दा आहेत.
गौतम गंभीर: रेकॉर्ड 25वे अर्धशतक-
गौतम गंभीरने आयपीएल-8च्या दोन सामन्यांमध्ये सतत दोन अर्धशकत ठोकले. पहिले मुंबई इंडियन्स आणि दुसरे रॉय चॅलेंजर्स बंगळुरुच्या विरोधात त्याने हे दोन अर्धशतक काढले आहेत. गौतमने बंगळुरुच्या विरोधात 25वे अर्धशतक केले होते. आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक अर्धशकत काढणारा गौतम पहिला बॅट्समन आहे. या आकड्यांपर्यंत पोहोचण्यासाठी केकेआरचा कर्णधार 106 सामने खेळला आहे आणि 2921 धावा काढल्या. एकूणच धावा काढण्याच्या बाबतीत तो तिस-या स्थानावर आहे. त्यानंतर सुरेश रैनाचे नाव येते. रैनाने आतापर्यंत 117 सामन्यांमध्ये 3343 धावा काढल्या आहेत. यादरम्यान एक शतक आणि 23 अर्धशतके केले आहेत.
पॉइंट टेबल-
टीम सामना विजय पराभव पॉइंट्स नेट रन रेट
चेन्नई सुपर किंग्स 2 2 0 4 +1.150
राजस्थान रॉयल्स 2 2 0 4 +0.700
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 1 1 0 2 +0.571
कोलकाता नाइट राइर्डस 2 1 1 2 +0.116
किंग्स XI पंजाब 2 1 1 2 -0.200
दिल्ली डेअर डेविल्स 2 0 2 0 -0.075
मुंबई इंडियन्स 2 0 2 0 -0.838
सनराइजर्स हैदराबाद 1 0 1 0 -2.250
खेळाडू षटकार
ब्रेंडन मॅक्कुलम 9
क्रिस गेल 7
दीपक हुड्डा 7
हरभजन सिंह 6
महेंद्र सिंह धोनी 6
खेळाडू कॅच
टिम साउदी 3
मंदीप सिंह 2
उमेश यादव 2
मयंक अग्रवाल 2
रवींद्र जडेजा 2

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या आयपीएल-8च्या आतापर्यंतचे टॉप-5 परफॉर्मरविषयी...