आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • German Footballer Mesut Ozil Donates Rupees 24 Crore For The Help Of Brazilian Children

जर्मन फुटबॉलरने ब्राझिलच्या गरीब चिमुकल्यांच्या उपचारासाठी दान केले 24 कोटी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्लिन- फुटबॉल विश्वचषक विजेता संघ जर्मनचा फुटबॉलर मेसूत ओझिल याने बक्षिसाचे 24 कोटी रुपये दान केले आहेत. उल्लेखनीय म्हणजे ओजिल याने ही रक्कम जर्मनीतील नव्हे तर ब्राझिलमधील गरीब चिमुकल्यांच्या उपचारासाठी दान केले आहेत. इतकी मोठी रक्कम दान करणारा ओजिल हा जगातील पहिला फुटबॉलर असावा. दरम्यान, विश्वचषकाच्या सेमीफाइनलमध्ये जर्मनीने ब्राझिलवर 7-0 असा ऐतिहासिक विजय मिळवला होता.

मेसूत ओझिलने ब्राझीलमधील चिमुकल्यांसाठी अफाट औदार्य दाखवले आहे. स्पर्धेदरम्यान, मिळालेली तब्बल 24 कोटींची रक्कम त्याने मुलांना दिले. विश्वचषक जिंकल्यानंतर जर्मनी संघाला ट्रॉफीसह 207 कोटी रुपये देऊन गौरवण्यात आले होते. या वेळी जर्मनी सरकार आणि फुटबॉल फेडरेशननेही विश्वविजेत्या संघावर कोट्यवधी रुपयांचा वर्षाव केला होता. संघातील प्रत्येक खेळाडूला 24 कोटींची रक्कम मिळाली होती.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, मेसूत ओझिलचा दानशूरपणा....

(फाइल फोटो: जर्मनचा फुटबॉलर मेसूत ओजिल)