आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • German Open Granprix Badminton News In Marath, Arvind Bhatt

जर्मन ओपन ग्रँडप्रिक्स बॅडमिंटन: अरविंद भटचा जर्मनीत ऐतिहासिक विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुल्हेइम - भारताचा युवा खेळाडू अरविंद भटने जर्मन ओपन ग्रँडप्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयासह त्याने जर्मन ओपनचा किताब पटकावला. या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा अरविंद हा पहिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरला.


भारताच्या 34 वर्षीय अरविंदने पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत डेन्मार्कच्या हॅँस क्रिस्टियनचा पराभव केला. त्याने रंगतदार लढतीत 24-22, 19-21, 21-11 अशा फरकाने रोमहर्षक विजय मिळवला. यासह त्याने स्पर्धेचा किताब आपल्या नावे केला. यासाठी त्याला तब्बल एक तास झुंज द्यावी लागली. मात्र, शिस्तबद्धपणे खेळी करत भारताच्या अरविंदने सामन्यात बाजी मारली.


दोेन वेळचा माजी नॅशनल चॅम्पियन अरविंद व क्रिस्टियन यांच्यात पहिल्या गेममध्ये तुल्यबळ लढत रंगली. मात्र, भारताच्या खेळाडूने शर्थीची झुंज देऊन पहिला गेम 24-22 ने जिंकला. त्यानंतर दुसरा गेम क्रिस्टियनने जिंकला होता.


1999 नंतर भारताला यश
तब्बल 24 वर्षांनंतर भारतीय खेळाडूने जर्मन ओपनची अंतिम फेरी गाठली होती. यापूर्वी गोपीचंदने ही किमया साधली होती. त्याने 1999 मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, त्याला चीनच्या खेळाडूकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे गोपीचंदला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.


सयाका ताकाहाशी विजेती
महिला गटात जपानच्या सयाका ताकाहाशीने एकेरीचे अजिंक्यपद पटकावले. तिने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात कोरियाच्या जी ह्यून सुंगला पराभूत केले. तिने 21-17, 8-21, 21-12 अशा फरकाने विजय मिळवला. कोरियाच्या खेळाडूने दुस-या गेममध्ये शानदार पुनरागमन करताना बाजी मारली. तिने बरोबरी साधली होती. तिला निर्णायक गेममध्ये सयाकाने हरवले.