आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ghost In His Room Pakistani Cricketer Sohail Falls Ill

पाकिस्तानी क्रिकेटरच्या हॉटेल रुममध्ये भूत, अर्ध्यारात्री बदलली खोली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - विश्वचषक खेळण्यासाठी न्यूझिलंडला पोहोचलेला पाकिस्तानी अष्टपैलू हॅरिस सोहेलने हॉटेलमध्ये भूत असल्याची धक्कादायक तक्रार केली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सोहेलला जाग आली त्यावेळी त्याने खोलीमध्ये भूत असल्याचे सांगितले. अर्ध्यारात्री सोहेलने हॉटेलच्या स्टाफला त्याची खोली बदलण्यास सांगितली. तसेच सोहेल त्यावेळापासुन आजारी पडला आहे.
एखाद्या आंतरराष्ट्रीय खेळाडूकडून आपल्या खोलीत भूत असल्याची ही पहिलीच तक्रार आहे. यापूर्वी पाकिस्तानी क्रिकेटर विदेश दौऱ्यावर असताना अनेकवेळा बदनाम झाले आहेत. विश्वचषकापूर्वी पाकिस्तान टीम न्यूझिलंडसोबत दोन एकदिवसीय आणि काही वार्मअप सामने खेळणार आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, सोहेलच्या क्रिकेट करिअरबद्दल...