आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girlfriend\'s Of Footballer Neymar Latest News In Marathi

हा 19 वर्षीय फुटबॉलपटू आहे \'ब्रम्‍हचारी बाप\', अन् 17 गर्लफ्रेंड्सचा धनी! बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्राझीलचा भावी 'पेले' म्‍हणून संबोधल्‍या जाणा-या लियोनल मेस्‍सीचा सहकारी 'नेमार'ने 19 व्‍या वर्षीच 17 गर्लफ्रेंड करुन सर्वांना आश्‍चर्यचकीत केले आहे. उल्‍लेखनिय तर हे आहे की, तो लग्‍नापूर्वीच बाप बनला आहे.

ब्रम्‍हचारी बाप
विदेशामध्‍ये लग्‍नापूर्वी मुलगा होणे याला गुन्‍हा मानले जात नाही. नेमारने 2010 मध्‍ये त्‍याच्‍यापेक्षा दीड वर्षे लहान असलेल्‍या कारोल दांतास सोबत डेटिंग केले. त्‍यावेळी तो अठरा वर्षांचा होता.

ब्रेकअप नंतर झाला मुलगा
अचानक काही कारणांमुळे नेमार आणि कारोल यांनी वेगवेगळे होण्‍याचा निर्णय घेतला. दोघेही वेगवेगळे झाल्‍यानंर काही दिवसानंतर कारोल गर्भवती असल्‍याचे निष्‍पन्‍न झाले. कारोलने 24 ऑगस्‍ट 2011 एका खासगी हॉस्‍पीटलमध्‍ये तिने बाळाला जन्‍म दिला. त्‍यावेळी नेमार तेथे उपस्थित होता.

वयाच्‍या 15 व्‍या वर्षांपासून नेमारने रियाल द माद्रिद कडून फुटबॉल खेळायला सुरुवात केली. जिनेदिन जिदान, रोनाल्डिन्हो, क्रिस्टीयानो रोनाल्डो आणि जॉर्ज वॅल्डानो सारख्‍या दिग्‍गज फुटबॉलपटूंसोबत खेळण्‍याची संधी मिळाली.

एका बिझनेस मासिकाच्‍या अहवालानुसार नेमार जगातील सर्वांधीक पैसा कमवणा-या फुटबॉलपटूंच्‍या यादीमध्‍ये सातव्‍या स्‍थानावर आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, फुटबॉलपटू नेमारची गर्लफ्रेंडसोबतची छायाचित्रे...