आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्यांची’ प्रकृती स्थिर, चाैकशीसाठी वैद्यकीय समिती स्थापन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केरळातील साई सेंटरमध्ये विष प्राशन करून अात्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या त्या तीन खेळाडूंची प्रकृती स्थिर अाहे. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू अाहेत, अशी माहिती साईच्या वतीने देण्यात अाली. प्रकरणाच्या चाैकशीसाठी वैद्यकीय समितीची स्थापना करण्यात अाली अाहे. या समितीद्वारे या प्रकरणाची सखाेल चाैकशी करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय क्रीडामंत्री सर्बानंद साेनाेवाल यांनी दिली. केरळ येथील साईमध्ये चार खेळाडूंनी गुरुवारी अात्महत्येचा प्रयत्न केला. यातील अपर्णा नावाच्या मुलीचा मृत्यू झाला.

या प्रकरणाच्या चाैकशीसाठी साईचे महासंचालक श्रीनिवास हे केरळ येथे दाखल झालेे अाहेत. तसेच केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी रुग्णालयात जाऊन उपचार सुरू असलेल्या खेळाडूंची भेट घेतली. या प्रकरणी अधिक माहिती घेण्याचे काम सध्या सुरू अाहे.
बातम्या आणखी आहेत...