आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Give Indian Team Leadership To Virat Kohl Azruddin

विराट कोहलीला भारतीय संघाचे नेतृत्व द्या - अझरुद्दीन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विराट कोहली हा अत्यंत चांगला खेळाडू असून आताच त्याला भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करण्याची संधी दिली पाहिजे, असे उद्गार भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अझरुद्दीनने काढले. विराट कोहली हा अतिशय गुणवान खेळाडू आहे. प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात वाईट काळ येतोच.

तसेच काहीसे विराटच्या बाबतीत घडले आहे. याच काळात त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे, असे सांगतानाच भारतीय क्रिकेट संघाच्या वाईट कामगिरीवर भाष्य करत अझरुद्दीनने संघाच्या व्यवस्थापन मंडळावर टीका केली. निवड समितीने भविष्याच्या दृष्टीने आताच पावले उचलणे गरजेचे असून विराट कोहलीच्या हाती भारतीय संघाची धुरा दिली पाहिजे. तसेच पाचदिवसीय व इतर सामन्यांसाठी वेगवेगळे संघ व कर्णधार निवडणे आवश्यक असल्याचे नमूद केले.

कोहली व पुजारा यांच्या खेळातील चुकांची कारणमीमांसा अझरुद्दीनने केली. दोन्ही खेळाडू गुणवान आहेत, परंतु दोघेही भारताबाहेर खेळताना सारख्याच चुका करत होते. अशा वेळेस संघाच्या व्यवस्थापनाची व कोचची जबाबदारी महत्त्वाची असते.