आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL GLAMOUR: मॅचनंतर होणार्‍या पार्टीचा असा असायचा नजारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात क्रिकेट शिवाय कोणताच खेळ लोकप्रिय नाही आणि आयपीएल त्यातील सर्वाधिक लोकप्रिय प्रकार आहे. यात देश-विदेशातून खेळाडू येतात, त्यासोबतच बॉलिवूडचे तारे-तारका यांचीही वर्दळ असते. जोडीला बिझनेस आयकॉन असतात. असा हा ग्लॅमर आणि पैशांचा खेळ मैदानात जेवढा रंगतो तेवढाच तो मैदानाच्या बाहेरही रंगतो. त्यामुळे अनेकदा आयपीएल चर्चेत देखील आले आहे.
क्रिकेट सामन्यानंतर रंगणाऱ्या पार्टीजमध्ये आयपीएल खेळाडू, टीम मॅनेजर्स, मेंबर्स आणि चियर लिडर्ससह बॉलिवूड स्टार्स सहभागी होतात. क्रिकेटर्ससाठी हे मैदानावरील थकवा घालवण्याचे साधन ठरते. मात्र, 2013च्या आयपीएल पर्वात फिक्सिंगचे डाग लागले आणि पार्टीज् बंद झाल्या. पार्टीमुळे खेळाडूंचे लक्ष विचलीत होते, असा युक्तीवाद त्यासाठी करण्यात आला. मात्र, पार्टी शिवाय आयपीएल हे खेळाडूंसाठी थोडे निराशाजनक आहे. 'दिव्य मराठी डॉट कॉम'खास आपल्या वाचकांसाठी 2013 पर्यंतच्या आयपीएल पार्टीचे फोटोज घेऊन आले आहे.

फोटो - वीरेंद्र सहवाग (डावीकडे), पार्टीत रंगून गेलेला युवराज सिंह (उजवीकडून वरच्या बाजूला) आणि सिद्धार्थ माल्यासोबत विराट कोहली (उजवीकडून खालच्या बाजूला)
पुढील स्लाइडमध्ये पाहा, 2010 आणि 2012 च्या पार्टीतील नजारा