आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Glasgow 2014: Carlin Wins Gold For Wales, Latest News In Marathi

CWG: जॅझ कारलिनने देशाला तब्‍बल चाळीस वर्षांनंतर मिळवून दिले सुवर्णपदक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लासगो - 20 व्‍या राष्‍ट्रकुल स्‍पर्धेमध्‍ये वेल्सची खेळाडू कॅम्पबेलने देशासाठी 40 वर्षांनंतर जलतरणात सुवर्ण जिंकले. जॅझ कॅम्पबेल, कॅमेरॉन व्हॅन डर बर्ग आणि चॅड ली क्लॉस यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकावत त्यांचे जलतरणातील वर्चस्व पुन्हा सिद्ध केले. वेल्सची जलतरणपटू जॅझ कारलिन हिने तिच्या देशासाठी 800 मीटरमध्ये जलतरणातील सुवर्ण पटकावले.
वेल्ससाठी तब्बल 40 वर्षांनी हे पदक पटकावणे शक्य झाले आहे, तर 100 मीटर फ्रीस्टाइलमध्ये कॅम्पबेलने तिची बहीण ब्राँटेला मागे टाकत सुवर्णपदक पटकावले, तर एम्मा मॅकेऑनला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ली क्लॉसने 100 मीटर बटरफ्लायची शर्यत सहजपणे जिंकत त्याचे श्रेष्ठत्व सिद्ध केले. ऑस्ट्रेलियाच्य खेळाडूंनीही स्पर्धा गाजवली.
इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या तिन्ही देशांनी मंगळवारी जलतरणात प्रत्येकी दोन सुवर्णपदके पटकावत पदक तालिकेतील घोडदौड कायम राखली आहे.
(फोटोओळ - सुवर्णपदकासह जॅझ कारलिन)
पुढील स्‍लाइडवर पाहा, जॅझ कारलिनची छायाचित्रे..