आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Glasgow Commonwealth Game News In Marathi, America Women Record

ऑस्ट्रेलियन महिलांचा नवा विश्वविक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लासगो- ऑस्ट्रेलियाच्या महिला जलतरणपटूंनी राष्ट्रकुल स्पर्धेत शुक्रवारी नव्या विश्वविक्रमाची नोंद केली. या खेळाडूंनी महिला गटाच्या 4 बाय 100 मीटर फ्रीस्टाइल रिले प्रकारात सुवर्णपदकाची नोंद केली. ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी 3 मिनिटे 30.98 सेकंदांत निश्चित अंतर पूर्ण केले. यासह या खेळाडूंनी नवा विक्रम प्रस्थापित केला. तसेच ऑस्ट्रेलियाच्या संघाने हिट्समध्ये राष्ट्रकुल स्पर्धेतील विक्रमही ब्रेक करून टाकला. शेवटच्या फेरीत 100 मीटर फ्रीस्टाइलची वर्ल्ड चॅम्पियन कॅट कॅपबेलने ऑस्ट्रेलियाला हे विक्रमी यश मिळवून दिले.

याच प्रकारात इंंग्लंडने रौप्य आणि कॅनडा संघाने कांस्यपदकाची कमाई केली. यापूर्वीचा या गटातील विक्रम हॉलंड संघातील महिला खेळाडूंच्या नावे होता.