आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Glasgow Commonwealth Games And Indian Player News In Marathi

गुडबाय 2014 : पदकांचा दुष्काळ; ‘डोपिंग’चे भूत गाडण्यात यश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - सुखेन डेसोबत राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकविजेता गणेश माळी.)
नवी दिल्ली – भारतीय वेटलिफ्टर्ससाठी मावळते वर्ष फारशी पदके मिळवून देऊ शकले नाही. मात्र, उत्तेजक द्रव्य चाचणीमधून सहीसलामत बाहेर पडल्याने भारतीय वेटलिफ्टर्सवर काही काळापासून कायम असलेले ‘डोपिंग टेस्ट’चे भूत गाडण्यात हे वर्ष यशस्वी ठरले आहे. त्यामुळे भारतासाठी हे लक्ष्य गाठणेदेखील एक मोठी कामगिरीच ठरली आहे. मात्र, एकंदरीत या सर्व कामगिरीमुळे भारताच्या वेटलिफ्टर्सच्या कामगिरीने चर्चा घडवून आणली.
इंडियन वेटलिफ्टिंग फेडरेशनकडून वर्षानुवर्षे स्वच्छ प्रतिमेसाठी प्रयास केले जात होते. ती प्रतिमा साध्य करणे सरत्या वर्षात शक्य झाले आहे.

या वर्षाच्या प्रारंभी स्कॉटलंडमध्ये भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत १२ पदके वेटलिफ्टिंगमध्ये पटकावली होती. त्यात तीन सुवर्ण, चार रौप्य आणि पाच कांस्यपदकांचा समावेश आहे. मागील २०१० मध्ये भारतीय संघाने मिळवलेल्या पदकसंख्येत त्यात अजिबात भर घालता आलेली नाही. तर इंचियोनमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतीय संघाला वेटलिफ्टिंगमध्ये एकही पदक पटकावता आलेले नाही.

वेटलिफ्टिंगमध्ये ओंकार ओंतारी पुण्याच्या गणेश माळीने सर्वांचे लक्ष वेधले. या दोघांनीही ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय संघाच्या पदकांचा भार जबाबदारीने पेलला. दोघांनी भारताला कांस्यपदक मिळवून दिले.
हेच मोठे यश
आशियाई स्पर्धेत पदक मिळवणे भारताला शक्य झाले नसले तरी एकही खेळाडू उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक चाचणीत दोषी आढळलेला नाही, हेच आमच्यासाठी मोठे यश असल्याचे भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षक हंसा शर्मा यांनी म्हटले आहे. आशियाई स्पर्धेत पाचपैकी दोनच महिलांची टेस्ट, तर सात पुरुषांपैकीदेखील दोनच पुरुषांची टेस्ट झाली असून त्यात कुणीही दोषी आढळलेले नाही. भारताच्या खेळाडूंची उत्तेजकांबाबतची प्रतिमा स्वच्छ असल्याचेही शर्मा यांनी नमूद केले.