आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Glasgow Commonwealth Games Gold Medalist Sushil Kumar Daily Diet

जाणून घ्‍या, CWG मध्‍ये सुवर्ण कामगिरी करणा-या सुशीलच्‍या डाएटविषयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोओळ - आपल्‍या मित्रांसोबत असा राहायचा सुशीलकुमार)
राष्‍ट्रकुल स्‍पर्धेमध्‍ये पाकिस्‍तानच्‍या मल्‍लाला चारीमुंड्या चीत करुन भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारा सुशील कुमार अत्‍यंत शात आणि सुस्‍वभावी आहे. त्‍याच्‍या आवडी निवडीही फार हटके आहेत. जाणून घ्‍या त्‍याच्‍या खासगी आयुष्‍याविषयी
खायला आवडते लोणी
सुशील कुमार दररोज सरावाच्‍या पुर्वी 150 - 200 ग्रॅम लोणी खातो. सुशील कुमारने एका टीव्‍ही चॅनलला दिलेल्‍या मुलाखतीमध्‍ये म्‍हटले होते की, लोणी खाने ही माझी आवड तर आहेतच शिवाय गरजही आहे. आईने बनविलेले लोणी मला जास्‍त आवडते.
शाकाहारी
सुशील कुमार शुध्‍द शाकाहारी असून त्‍याची डाएट करण्‍याची पध्‍दतसुध्‍दा साधी आणि सोपी आहे. तो दररोज तूप, बदाम आणि दुध आहारामध्‍ये घेतो.
सुशीलचा खुराक
सुशील कुमार दररोज सरावाच्‍या पुर्वी 150 - 200 ग्रॅम लोणी खातो.जास्‍त गर्मी असेल तर ग्‍लूकोजही घेतो. 200 ग्रॅम बदाम गिरी, सकाळ आणि सध्‍याकाळी दोन ते अडीच लीटर दुध, दुपारी तीन चपात्‍या आणि लोणी, आहारामध्‍ये फळांचा समावेश, सकाळ-संध्‍याकाळ दोन-दोन ग्‍लास फळांचा ज्‍यूस, सकाळी दीड तास आणि संध्‍याकाळी तीन तास सराव

फुटबॉल आणि बास्‍केटबॉलचा उत्‍कृष्‍ठ खेळाडू
सुशील कुमार एका आठवड्यामध्‍ये तीन दिवस फुटबॉल, बास्‍केटबॉल आणि हँडबॉल खेळतो. तीनही खेळातील त्‍याची चमक आणि कामगिरी वाखानण्‍याजोगी आहे.

गाणे ऐकायला आवडतात
तणाव मुक्‍त होण्‍यासाठी सुशील कुमार गाणे ऐकतो. त्‍याला लोकगीत ऐकायला खूप आवडतात. तो स्‍वत:ही गाणे गुनगुनायला लागतो. चित्रपटाची त्‍याला आवड नाही. तो पुर्णता कुस्‍तीसाठीच बनला आहे. तसेच फावल्‍या वेळामध्‍ये तो लॅपटॉपवर त्‍याच्‍या कुस्‍तीच्‍या तसेच अन्‍य पहिलवानांच्‍या लढती पाहतो.
पुढील स्‍लाइडवर पाहा, सुशील कुमारचे कुस्‍ती सोडून इतर छायाचित्रे..