आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदक विजेत्यांवर होणार लाखोंचा वर्षाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ग्लासगोत झालेल्या 20 व्या राष्ट्रकुल स्पर्धेतील राज्याच्या पदक विजेत्या खेळाडूंवर शासनाकडून लाखो रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. खेळाडूंच्या बक्षीसाबाबत राज्य शासनाने नुकताच महत्वपूर्ण निर्णय घेतला. राज्यातील सुवर्णपदक विजेत्याला 50 लाख, रौप्यपदक विजेत्याला 30 लाख तर कांस्यपदकाला 20 रुपये बक्षीस दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे राही सरनोबतला उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्त देण्याची घोषणा मंगळवारी राज्य शासनाकडून करण्यात आली.

राष्ट्रकुल पदक विजेत्यांचा गौरव
राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्यांवरच महाराष्ट्र शासन यंदा चांगलेच मेहेरबान झाले आहे. यावेळी पदक विजेत्यांच्या बक्षीसात घसघशीत वाढ करण्यात आली आहे. दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना तुटपुंजी रक्कम मिळाली होती. त्यावेळी सुवर्णपदक विजेत्याला 10 लाख, रौप्यला 7.5 लाख तर कांस्यला 5 लाख रुपये बक्षीस देण्यात आले होते.

राज्याच्या या खेळाडूंनी जिंकली पदके
राही सरनोबत (सुवर्ण), अयोनिका पॉल (रौप्य, नेमबाजी), गणेश माळी, ओकांत ओतारी आणि चंद्रकांत माळी (कांस्य, वेटलिफ्टिंग).

(फोटो : राही सरनोबतची उपजिल्हाधिकारीपदी थेट नियुक्ती)