आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Glasgow Commonwealth Games, Scotland, News In Marathi

20 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांच्या शतकासाठी भारतीय संघ झुंजणार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लासगो- विसाव्या राष्ट्रकुल स्पर्धेला बुधवारी मोठ्या उत्साहात स्कॉटलंडच्या ग्लासगो येथे प्रारंभ होत आहे. बुधवारी रात्री 11.30 वाजता स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचा दीप प्रज्वलित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत पुन्हा एकदा पदकांचे शतक झळकवण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. मागील राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने 101 पदके जिंकून पदक तालिकेत दुसरे स्थान गाठले होते. यंदाच्या स्पर्धेत भारताचा 215 सदस्यीय संघ स्पर्धेत सहभागी झाला आहे. हे सर्व खेळाडू 14 खेळ प्रकारांत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. मात्र, यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघासमोर इंग्लंडच्या खेळाडूंचे तगडे आव्हान असेल. त्यामुळे पदक तालिकेत भारताची तिसर्‍या स्थानी घसरण होण्याची शक्यता आहे.
भारतीय संघाला यांच्याकडून आहेत पदकाच्या आशा
>थाळीफेक - विकास गौडा, कृष्णा पुनिया, सीमा अंतिल
>400 मी. रिले- टिटू लुका, अश्विनी अंकुजी
>बॅडमिंटन- पी. व्ही. सिंधू, ज्वाला गुट्टा, अश्विनी पोनप्पा (महिला दुहेरी)
>लांब उडी-मयुखा
>मुष्टियुद्ध - विजेंद्र सिंह, शिवा थापा, सुमीत सागवान, देवेंद्र सिंह
>शूटिंग-अभिनव, जयदीप, गगन नारंग, हिना सिद्धू, राही सरनोबत.
>स्क्वॅश- दीपिका पल्लिकल, जोशना चिनप्पा, सौरव, हरमिंदर
>ज्युदो- गरिमा
>टेबल टेनिस- ए. शरथ कमल, सौम्यजित घोष, अंकिता दास, पलोमी घटक
>कुस्ती-सुशीलकुमार, योगेश्वर दत्त
>बॅडमिंटन- पॅरा स्किइंग प्रशांत कर्मकार
>हॉकी- पुरुष आणि महिला संघ

० 2010 मध्ये भारताने जिंकली होती 101 पदके
०ग्लासगोमधील नवीन क्रीडा प्रकार ट्रायथलॉन, माउंटेन बाइकिंग, ज्युदो, महिला मुष्टियुद्ध
०हे प्रकार वगळले- तिरंदाजी, टेनिस, चालणे, सिंक्रोनाइज्ड स्विमिंग, ग्रीको रोमन कुस्ती आणि शूटिंगचे काही प्रकार कमी करण्यात आले.

>71 देशांचा सहभाग
>03 ऑगस्ट रोजी समारोप
>417 खेळाडू ऑस्ट्रेलियाचे
>18 प्रकारचे खेळ
>261एकूण पदके
>215 खेळाडू भारतीय

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या हस्ते उद्घाटन
ग्लासगो येथे सुरू होणार्‍या 20 व्या राष्ट्रकुल स्पर्धेचे उद्घाटन महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या हस्ते होणार आहे. सेल्टिक पार्क येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात रॉकस्टार रॉड स्टीवर्ट, सुजैन बोयल, एमी मॅकडोनाल्ड आणि ज्युली फोलिस कलागुण सादर करणार आहेत.

पंतप्रधानांकडून भारतीय संघाला खास शुभेच्छा
स्कॉटलंड येथील 20 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास शुभेच्छा दिल्या. भारताचा 215 सदस्यीय संघ स्पर्धेत सहभागी झाला आहे. ‘स्पर्धेत सहभागी झालेल्या भारताच्या सर्व खेळाडूंना माझ्याकडून शुभेच्छा,’ असेही मोदी म्हणाले.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, विजयकुमार भारताचा ध्वजधारक....