आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्‍वचषक OMG : या टॉप-10 गोलंदाजांनी फलंदाजांची उडविली होती ‘दाणादाण’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्ग्राथ)
क्रिकेटचा महासंग्राम अर्थात ‘विश्‍वचषक-2015’ अवघ्‍या 31 दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्व सहभागी संघांची घोषणा झाली आहे. विश्‍वचषक ऑस्‍ट्रेलिया आणि न्‍यूझिलंडच्‍या भूमीत होत असून तेथील खेळपट्टी वेगवान गोलंदाजीसाठी पुरक आहेत. Divyamarathi.com आपणास विश्‍वचषकातील रंजक रेकॉर्ड्स विषयी सांगणार आहे.
उत्‍कृष्‍ट गोलंदाजीचा विश्‍व विक्रम मॅक्ग्राथच्‍या नावे
विश्‍वचषकात एका इनिंगमध्‍ये उत्‍कृष्‍ठ गोलंदाजीचा विश्‍वविक्रम ऑस्‍ट्रेलियाचा घातक गोलंदाज ग्लेन मॅक्ग्राथच्‍या नावे आहे. त्‍याने नामिबियाविरुध्‍द 2003 मध्‍ये 7 षटकात फक्‍त 15 धावा देत सात गोलंदाजांना बाद केले होते. चार षटके निर्धाव होती.
फक्‍त 45 धावांवर सर्वबाद झाला होता नामिबिया
मॅक्‍ग्राथच्‍या घातक गोलंदाजीमुळे नामिबिया संघ केवळ 14 षटकात 45 धावा करत सर्वबाद झाला होता. तत्‍पूर्वी फलंदाजी करुन ऑस्‍ट्रेलियाने 301 धावा केल्‍या होत्‍या.
10 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही
नामिबियाच्‍या 10 फलंदाजांना दूहेरी आकडा गाठता आला नव्‍हता. नामिबियाकडून कर्णधार डियोन कोट्जेने सर्वाधिक 10 धावांची खेळी साकारली होती.
डाव
नामिबिया
फलंदाज
जॅन बॅरी बर्गर - 1
स्टेफन स्वानेपॉएल - 2
मॉर्ने कर्ग - 4
डॅनी क्यूल्डर - 3
गॅविन गुर्गाट्रॉएड - 0
कोट्जे - 10
लुईस बर्गर - 1
मेल्ट वॉन शॉर - 6
ब्जॉर्न कोट्जे - 0
बुर्टन वॉन रोई - नाबाद 0
रुनी वॉन व्यूरेन - 0
गोलंदाज
ग्लेन मॅक्‍ग्राथ - सात षटकात 15धावा देत 7 विकेट
ब्रेट ली - 6 षटकात26 रन देत एक विकेट
एंडी बिचेल – एका षटकात निर्धाव दोन विकेट
टोटल
ऑस्ट्रेलिया : 301/6 रन, नामिबिया : 45 रन
पुढील स्‍लाइडवर वाचा, विश्‍व चषकातील 9 गोलंदाज ज्‍यांच्‍यापूढे फलंदाजांनी टेकले गुडघे ...