आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: ग्‍लॅन मॅकग्राही बनला मेणाचा, मॅडम तुसाद संग्रहालयात पुतळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी- ऑस्‍ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्‍लेन मॅकग्राच्‍या मेणाच्‍या पुतळयाची स्‍थापना गुरूवारी मॅडम तुसाद संग्रहालयात करण्‍यात आली.

ऑस्‍ट्रेलियात लोकांना मतदान करून मॅडम तुसाद संग्रहालयात कोणत्‍या खेळाडूचा मेणाचा पुतळा असावा यासाठी ऑस्‍ट्रेलियातील लोकांना मतदान करून निवडण्‍याची मुभा दिली होती. यामध्‍ये मॅकग्राने सर्वात जास्‍त मतदान करून सर्वोच्‍च स्‍थान पटकाविले होते. गोलंदाजी करतानाची मॅकग्राची प्रतिमा दाखवण्‍यात आली आहे. पुतळा अनावरणावेळी मॅकग्रा उपस्थित होता. त्‍यावेळी गोलंदाजी करण्‍याची नक्‍कलही केली.

या पुतळयाला पांढ-या रंगाची जर्सी घालण्‍यात आलेली असून त्‍याला नंबर 358 देण्‍यात आला आहे. मॅकग्राने आपले बूट आणि चेंडू या प्रतिमेसाठी दिले आहेत. त्‍याचा पुतळा आता शेन वॉर्न, डॉन ब्रॅडमन आणि सचिन तेंडुलकर यांच्‍याबरोबर ठेवण्‍यात येणार आहे.

हा पुतळा बनवण्‍यासाठी 800 तास आणि 60 कारागीर लागले असून. त्‍याच्‍या डोळे, त्‍वचा आणि केसांचा रंग हुबेहुब येण्‍यासाठी 250 वेळा माप घेण्‍यात आले होते.