आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Glosgow 2014, Commonwealth Games News In Marathi

राष्ट्रकुल स्पर्धेत धडाकेबाज; कश्यप, ज्वालाचा एकतर्फी विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लासगो- जागतिक चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेत्या पी.व्ही. सिंधूच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने राष्ट्रकुल स्पर्धेतील आपल्या मोहिमेला धडाकेबाज सुरुवात केली. बॅडमिंटन खेळ प्रकारात घानाविरुद्ध सामन्यात भारतीय संघाने 5-0 अशा फरकाने एकतर्फी विजयाची नोंद केली. पी. कश्यपने पुुरुष एकेरीच्या लढतीत घानाच्या डी. सॅमला 27 मिनिटांत 21-6, 21-16 ने धूळ चारली. त्यापाठोपाठ 19 वर्षीय व्यंकटा पुसारलाने महिला एकेरीच्या लढतीत बाजी मारली. त्यानंतर ज्वाला-अश्विनी पोनप्पाने आर्चरई- बोतवी या जोडीचा 21-4, 21-10 ने पराभव केला. तसेच देवालकरनेही भारताला विजय मिळवून दिला.