आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • God Blessing On Team India In Practice Matach, Kivi Declared Its Match On 262 Runs

सराव सामन्यात टीम इंडियावर ‘ईश्वरी’ कृपा!,किवींचा डाव 262 धावांवर घोषित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वांगारेई - वनडे मालिकेतील पराभवातून सावरलेल्या टीम इंडियाने रविवारी न्यूझीलंड एकादशविरुद्ध दोनदिवसीय सराव सामन्यात समाधानकारक कामगिरी केली. त्यामुळे यजमानांच्या टीमने 262 धावांवर पहिला डाव घोषित केला. भारताकडून ईश्वर पांडेपाठोपाठ (3/43), ईशांत शर्मा (2/58) आणि आर.अश्विन (2/45) यांनी धारदार गोलंदाजी केली. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या दिवसअखेर पहिल्या डावात चांगली सुरुवात केली. या टीमने बिनबाद 41 धावा काढल्या. सलामीवीर मुरली विजय 19 आणि शिखर धवन 16 धावांवर खेळत आहेत.
यजमानांच्या टीमने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर जी.वोर्केर (33) व ओडोन्नेल्लाने (80) टीमला 81 धावांची सलामी दिली. दरम्यान अश्विनने वोर्केरला पायचीत करून संघाला पहिला बळी मिळवून दिला. त्यापाठोपाठ जहीरने डेविचला (9) बाद केले. अखेर, हिकीने संघाचा डाव सावरला. त्याने ओडोन्नेल्लासोबत 57 धावांची भागीदारी केली. ओडोन्नेल्लाने 124 चेंडूंत80 धावा काढल्या. हिकस (5), वॉल्श (1), सैफेर्ट (8) आणि बोऊल्ट (8) हे स्वस्तात बाद झाले.
संक्षिप्त धावफलक- न्यूझीलंड एकादश : पहिला डाव 262 (डाव घोषित), भारत : बिनबाद 41 धावा (विजय नाबाद 19, धवन नाबाद 16).