आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोल्फपटू टायगर वुड्सने सुरू केला नवा लव्ह गेम

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मियामी- विवाहबाह्य संबंध जगजाहीर झाल्यानंतर वादाच्या भोव-यात सापडणारा जगातील माजी नंबर वन गोल्फपटू टायगर वुड्सने नवा लव्ह गेम सुरू केला आहे. 37 वर्षींय वुड्स पुन्हा डेटिंगवर आहे. या वेळी त्याच्यासोबत आहे 28 वर्षांची अमेरिकेची स्की रेसर लिंडसे वॉन. विशेष म्हणजे या दोघांनी सोशल साइट्स फेसबुकवर आपल्या संबंधाचा जाहिरपणे खुलासा केला. दोघांनी एकमेकांचे सोबत असलेले फोटो पोस्ट केले आहेत. अनेक महिलांसोबत संबंध असलेला वुड्स प्रथमच खेळाडू महिलेसोबत डेटिंग करत आहे.

फेसबुकवर हे लिहिले वुड्सने : नुकताच किताब जिंकल्याने मी खुश आहे. गोल्फ कोर्स बाहेरदेखील मी लिंडसे वॉनसोबत आनंदी आहे. गेल्या काही दिवसांपासून आम्ही अधिक जवळ आलो आहे आणि डेटिंगवर आहे. चाहत्यांचे आम्ही आभार मानतो, असे त्याने फेसबुकवर लिहिले.

लिंडसेचाही झाला घटस्फोट- 2010 विंटर ऑलिम्पिकमधील चॅम्पियन स्की रेसर लिंडसे अमेरिका वर्ल्डकप विजेत्या टीमची सदस्य आहे. याच वर्षी तिला लॉरेन्स वर्ल्ड स्पोटर्स पुरस्कार मिळाला होता. सप्टेंबर 2007 मध्ये तिने आपला सहकारी खेळाडू थॉमस वॉनसोबत लग्न केले होते. मात्र, हे लग्न फार दिवस टिकले नाही. नोव्हेंबर 2011 मध्ये दोघांनी घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. प्रक्रिया सुरू झाली आणि जानेवारी 2013 मध्ये दोघांना घटस्फोट मिळाला. 2010 मध्ये लिंडसेची कमाई 2.5 मिलियन डॉलर इतकी होती.

लिंडसे वॉन : एक नजर
जन्म : 18 ऑक्टोबर,1984; खेळ : स्कीइंग ऑलिम्पिक : 1 सुवर्ण ; वर्ल्ड चॅम्पियनशिप : 1
- लिंडसेने दोन वर्षांची असताना स्कीइंगला सुरू केले. वयाच्या 17 व्या वर्षी पहिल्यांदा विंटर ऑलिम्पिकमध्ये सहभाग. ३2003- वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक.
लिंडसेला दुखापत झाल्यानंतर वुड्सने खासगी विमान पाठवले

वुड्स-वॉन यांच्यातील संबंधाचे वृत्त सर्वात पहिले फेब्रुवारीत समोर आले होते. या वेळी ती अल्पाइन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झाली होती. यादरम्यान तिला दुखापत झाली होती. वुड्सने तिला ऑस्ट्रेलियामधून घेऊन जाण्यासाठी प्रायव्हेट जेट पाठवले होते.